मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पतंगराव कदम यांचा राजकीय प्रवास...

पतंगराव कदम यांचा राजकीय प्रवास...

सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान देणारे पतंगराव कदम यांच्या निधनानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान देणारे पतंगराव कदम यांच्या निधनानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान देणारे पतंगराव कदम यांच्या निधनानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

  10 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंतगराव कदम यांचं काल निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर लीलावती हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. पण त्यांच्या अशा अकाली जाण्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

  सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान देणारे पतंगराव कदम यांच्या निधनानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काल सकाळीच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही हॉस्पीटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती.

  सांगली जिल्ह्यातल्या वांगी या त्यांच्या मूळ गावी पतंगराव कदम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी पुण्यातल्या त्यांच्या सिंहगड या बंगल्यात आणि त्यानंतर भारती विद्यापीठात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

  पतंगराव कदम १९८५ ते २००४ या दरम्यान तब्बल सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या मतदारसंघाचे ते जवळपास २९ वर्ष आमदार राहिले. तसंच राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिलं.

  पतंगराव कदम कालवश

  - जन्म - 8 जानेवारी 1944

  - जन्मगाव - सोनसळ, सांगली

  - 1985 - पहिल्यांदा आमदार म्हणून निवड

  - नंतर सलग 6 वेळा विधानसभेवर

  - माजी महसूल, सहकार, वनमंत्री

  - मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदही हाताळलं

  - भारती विद्यापीठाचे संस्थापक

  - भारती विद्यापीठाची एकूण 180 महाविद्यालयं

  असा होता राजकीय प्रवास

  - जून 1991 -मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री

  - मे 1992 - 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)

  - ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री

  - नोव्हेंबर 2004 पासून पुढे - पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री

  - प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

  - डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल, - पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण

  - मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते

  - नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - वनविभाग

  - 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य - वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन

  First published:
  top videos