विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 21 जून : महाराष्ट्राची चेरापुंजी अशी सिंधुदुर्गच्या आंबोली घाटाची ओळख आहे. जगभरातील पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी भुरळ घालणारं ठिकाण आहे. मात्र, अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने कमी मात्र मृतदेह फेकण्याचं ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख बनू लागली आहे. यानिमित्ताने धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आंबोली घाटामध्ये मुख्य धबधब्यापासून चार किलोमीटर अंतरावर 200 फूट खोल दरीमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. सावंतवाडीहून चौकुळकडे परतणाऱ्या एका गावकऱ्याला आंबोली घाटातील दरड कोसळलेल्या ठिकाणी मंगळवारी रात्री दरीत एक मृतदेह अडकलेल्या स्थितीत आढळला. सचिनने केले क्लीन बोल्ड, पण बॅट्समनला आला राग, घडलं भयानक कांड गावकऱ्याने याची माहिती आंबोली पोलिसांना दिली. मात्र, दरीचा भाग खोल आणि धोकादायक असल्याने रात्रीच्या वेळी मृतदेह काढण्यात आला नाही. हा मृतदेह आढळल्यानंतर अपघात की घातपात संशय व्यक्त होत आहे. वर्षा पर्यटनाच्याआधी आंबोली घाटामध्ये मृतदेह मिळाल्याने स्थानिकामध्ये भीतीचं वातावरण आहे. याआधी दोन प्रकरणात मृतदेह याच ठिकाणी आणून खोल दरीत फेकले होते. त्यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांमधून केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.