जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Thane Crime : चक्क सुनेने सासूची बोटे छाटली कारण ऐकून तुम्हीही म्हणाल… नवऱ्यालाही मारहाण

Thane Crime : चक्क सुनेने सासूची बोटे छाटली कारण ऐकून तुम्हीही म्हणाल… नवऱ्यालाही मारहाण

Thane Crime : चक्क सुनेने सासूची बोटे छाटली कारण ऐकून तुम्हीही म्हणाल… नवऱ्यालाही मारहाण

सासूने टीव्ही बंद केला म्हणून सुनेने सासूबाईंची तीन बोटे छाटून टाकल्याची घटना ठाण्यातील अंबरनाथ येथे घडली आहे. हे कमी म्हणून की काय, नंतर तिने पतीच्याही कानशिलात लगावली. (THANE CRIME)

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 09 सप्टेंबर : सासू आणि सून म्हंटल की भांडण हे आलेच कधी सासू सुनेवर वरचढ ठरते तर कधी सून सासूला बोलते. आपण यापूर्वी बऱ्याच वेळा ऐकलं असेल सासूने सुनेला मारहाण केल्याचे पण ठाण्यात जरा वेगळंच घडलं आहे. (Thane Crime) चक्क सुनेने सासूबाईला मारहाण केली आहे ते पण बाेटे कापून टाकण्यापर्यंत झाली आहेत. सासूने टीव्ही बंद केला म्हणून सुनेने सासूबाईंची तीन बोटे छाटून टाकल्याची घटना ठाण्यातील अंबरनाथ येथे घडली आहे. हे कमी म्हणून की काय, नंतर तिने पतीच्याही कानशिलात लगावली. याप्रकरणी सासूने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

जाहिरात

सासू आणि सून यांच्यात काही कारणांवरून एरव्ही कुरबुरी होत असतात. मात्र, या घटनेत सून हिंसक झाली आणि तिने सासूबाईंवरच हल्ला केला. झाले असे की, सासूबाई घरात पूजा करण्यात मग्न होत्या. यावेळी त्या भजनही गात होत्या. मात्र, 32 वर्षीय सून घरात मोठ्या आवाजात टीव्ही पाहत बसली होती.

हे ही वाचा :  देवीच्या जागणारासाठी विकली 3 एकर जमीन, मग घडलं असं काही की बोलवावे लागले पोलीस

पूजा करताना मोठा आवाज येत असल्याने सासूने सुनेला टीव्ही बंद करण्यास सांगितले. तथापि सुनेने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर सासूने आवाज कमी करण्याची विनंतीही केली. त्याचाही उपयोग न झाल्यामुळे त्यांनी स्वत: उठून टीव्ही बंद केला. सासूने टीव्ही बंद केल्याचे पाहताच सून संतापली आणि तिने धारदार शस्त्राने हल्ला करत सासूच्या हाताची बोटे कापून टाकली. हा वाद पाहून महिलेचा पती दोघींमध्ये पडला. मात्र, पत्नीने त्यालाही मारहाण केली.

जाहिरात

हे ही वाचा :  अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण; तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप

हिंगोलीत आंधश्रद्धेचा कळस

आज जग विज्ञानाच्या मदतीने दिवसेंदिवस प्रगती करत खूप पुढे चाललं आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी अशा काही घटना घडतात, ज्या सर्वांनाच थक्क करून सोडतात. अशीच एक घटना आता हिंगोलीतून समोर आली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी तांडा या गावात अंधश्रद्धेची हद्दच पार झाली आहे. या गावात एका सहा महिन्याच्या बालिकेच्या रूपाने देवीने अवतार घेतल्याची अफवा पसरली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात