मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dapoli Sai Resort : ईडीचा विषय खोल, सरपंच आणि ग्रामसेवकांना सुद्धा पाठवल्या नोटीसा, काय आहे प्रकरण?

Dapoli Sai Resort : ईडीचा विषय खोल, सरपंच आणि ग्रामसेवकांना सुद्धा पाठवल्या नोटीसा, काय आहे प्रकरण?

 रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा एकदा ED कडून मुरुड ग्रामपंचायतीत झाडाझडती करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा एकदा ED कडून मुरुड ग्रामपंचायतीत झाडाझडती करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा एकदा ED कडून मुरुड ग्रामपंचायतीत झाडाझडती करण्यात आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

रत्नागिरी, 04 डिसेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा एकदा ED कडून मुरुड ग्रामपंचायतीत झाडाझडती करण्यात आली. तपासासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेऊन, तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक विद्यमान सरपंचाला मूळ दप्तर घेऊन  ED कार्यालयात बोलावण्यात आले आहे. साई रिसॉर्ट प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दुसरीकडे पुन्हा एकदा ED चा ससेमिरा पाठी लागला आहे.

मुरुड ग्रामपंचायतीच्या मूळ दप्तरातून ED कार्यालयाकडून काय सत्य बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु ED कार्यालयाकडून मूळ दप्तर ताब्यात घेण्यात आल्याने मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा : भाजप आणि शिंदे गटात चाललंय काय? राऊतांचा खळबळजनक दावा

किरीट सोमय्यांनी दिली चुकीची माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरण गेले अनेक दिवस वादात सापडले आहे. अलीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाची हाणी होत असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

मात्र, काल या ठिकाणी महसूल, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाहणी करून गेले असून, साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आले नसल्याचे  पाहणीत दिसून आले आहे. या पूर्वीच  दापोली उपविभागीय अधिकारी यांनीही शासनाला अहवाल सादर केला होता.

हे ही वाचा : ...तर शिंदे सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत, संजय राऊतांचा दावा

हॉटेल पासून काही अंतरावर सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी टाकी आढळून आली आहे. परंतु समुद्रापासून काही अंतरावर बांधण्यात आली असल्याने त्या टाकीला कोणतीही पाईप जोडून समुद्रात थेट पाणी सोडण्यात आले नसल्याचे दिसून आल्याने केलेला दावा फोल ठरला जाण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्यांचा यापूर्वीही यु टर्न

मागच्या काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या भला मोठा प्रतिकात्मक हातोडा घेऊन रिसॉर्ट पाडण्यासाठी आले होते. दरम्यान ते रिसॉर्ट पाडणार का? याबाबत सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु सोमय्यांनी रिसॉर्टच्या बाहेरील काही अंतरावर गाडी पार्किंगसाठी लावण्यात आलेल्या टाइल्सवर प्रतीकात्मक हातोडा मारला अन् अवघ्या काही क्षणात ते तिथून निघून गेले.

मागच्या दोन दिवसांपासून सोमय्या म्हणत होते मी जाऊन रिसॉर्ट पाडणार परंतु त्यांनी अवघ्या काही तासातच  त्यांनी पलटी मारल्याचे बोलले जात आहे. आपण हॉटेलवर नाही तर अनिल परब यांनी सरकारी जागेत केलेल्या बेकायदेशीर जागेवरील हातोडा मारल्याचा उल्लेख करत त्यांनी बोलण्याचे टाळले. यावर सोमय्यांनी केलेल्या गाजावाजाचा चांगलाच पचका झाल्याचे दापोलीत चर्चा सुरू होती.

First published:

Tags: Anil parab, Case ED raids, Dapoli, ED (Enforcement directorate), Kirit Somaiya, Ratnagiri