अमरावती, 16 डिसेंबर : जगात अशा अनेक वास्तू किंवा प्रतिकृती आहे, ज्यांना नैसर्गिकरित्या एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. ज्याकडे बघितल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडेल आणि तो एकटक बघत राहील, असे अनेक अजूबे जगात आजही कायम आहे. त्यातीलच एक अजूबा आणि परिसरातील नागरिकांसाठी एक रहस्य असलेली अमरावती तील अंजनसिंगी येथील स्मशानभूमी. या स्मशानभूमीकडे कोणत्याही दिशेने बघितले तर, ती त्याच बाजूने झुकलेली दिसते. अंजनसिंगी परिसरातील नागरिकांसाठी अजूबा असलेली स्मशानभूमी रस्त्यावरून येणेजाणे करणाऱ्यांसाठी एक रहस्यच बनली आहे. त्याच कारणंही तेवढे वेगळंच आहे. या स्मशानभूमीकडे कोणत्याही दिशेने बघितले तर, ती त्याच बाजूने झुकलेली आपल्याला दिसेल. डावीकडे उभे राहून बघितली तर ती डावीकडे झुकलेली दिसेल, उजवीकडून बघितली तर ते उजवीकडे झुकलेली दिसेल आणि एका सरळ रेषेत बघितली तर ती स्मशानभूमी आपल्याला सरळ मुख्य स्वरूपात उभी असलेली दिसेल. याच कारणामुळे अंजनसिंगी येथील ही स्मशानभूमी परिसरात एक अजूबा बनली आहे. याच रहस्य जेव्हा News 18 लोकलने परिसरातील एका गुरे चारणाऱ्या व्यक्तीकडून जाणून घेतले, तेव्हा एक याबाबतच एक वेगळेच कारणं समोर आलं आहे. साईभक्तांच्या सबुरीला फळ, नागपूर ते शिर्डी एसटी सुरू, Video स्मशानभूमीच नेमकं रहस्य काय ? परिसरातील नागरिकांसाठी अजूबा असलेल्या या स्मशानभूमीच रहस्य हे नैसर्गिक आहे. काही वर्षांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे या स्मशानभूमीचे लोखंडी खांब सरळ आणि समोरच्या दिशेने झुकले. यातूनच हा अजूबा समोर आला असल्याचं स्थानिक सांगतात. जर डावीकडून तिच्याकडे बघितले तर ती डावीकडे आपल्याला झुकलेली दिसेल, उजवीकडून आपण बघितली तर ती आपल्याला उजवीकडे झुकलेली दिसेल, आणि सरळ जर बघितले तर ती स्मशानभूमी आपल्याला सरळ उभी दिसेल. लाईट, पाणी, रस्ता नाही!, देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर विकासापासून दूर 3D स्मशानभूमी पण हे कारण फक्त स्थानिकांना माहीत असल्याने रस्त्यावरून येणेजाणे करणाऱ्या नागरिकांसाठी ही 3D स्मशानभूमी अजूबाच वाटत आहे. कोणताही नवीन व्यक्ती 2 मिनिटं या स्मशानभूमीकडे एकटक बघितल्याशिवाय राहत नाही. असं या स्मशानभूमीच रहस्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.