मुंबई, 29 जून : जागतिक पातळीवर व्यवसायिक मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातही फार मोठे बदल झाला आहेत. शिक्षणाव्यतिरिक्त व्यवसाय-उद्योगधंदे याही क्षेत्रांना अधिकाधिक महत्व प्राप्त होउ लागले आहे. नव्याने उदयास येणाऱ्या या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास या क्षेत्रात पारंगत होणे आवश्यक आहे. यासाठीच मुंबई विद्यापीठातर्फे, BMS (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज), MMS ( मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) आणि MSc Finance हे कोर्स सुरू झाले आहेत. (Courses in Management Studies) विभागप्रमुख स्मिता शुक्ला म्हणल्या की, “सर्व विभागामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय क्षेत्रात विविध संधी आहेत. साधरण MMS आणि MSc Finance हे प्रत्येकी 2 वर्षाचे कोर्स असून आणि BMS हा तीन वर्षाचा कोर्स आहे. विद्यार्थ्याना अनेक सुविधा दिल्या जातात. यामधे हॉस्टेल, लॅब, शिक्षक, अभ्यासाचे साहित्य, अशा विविध सुविधा पुरवल्या जातील. आमचं प्लेसमेंटदेखील जवळ जवळ 100 टक्के आहे. कॅम्पसमध्ये मोठमोठ्या कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. वाचा :
Mumbai : सुरूवातीचं Job पॅकेजच 10 लाखांचं असणार; फक्त मुंबई विद्यापीठात ‘हा’ पूर्ण कोर्स करावा लागणार, कसा कराल अर्ज?
1) MSc Finance कोर्समध्ये प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांना CET ही परीक्षा द्यावी लागेल.या प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन आणि परीक्षेची तारीख निश्चित झालेली नाही. विद्यापीठाच्या वेबसाईटवर याची माहिती अपडेट केली जाते. हा कोर्स 2 वर्षांचा असून यामध्ये 4 सेमिस्टर आहे. तर यामध्ये कोर फायनान्स संबंधी पेपर्स आहेत. 2 वर्षांसाठी प्रत्येक 1 लाख अशी फी आहे. विद्यार्थ्यांची संख्या 30 इतकी आहे. 2) BMS कोर्समध्ये विद्यार्थ्यांना १२ वीच्या निकालानंतर मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर नोंदणी करून संस्थेचा ऑफलाईन अर्ज भरावा लागतो. सदर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. 3 वर्षांचा हा कोर्स आहे असून एकूण 6 सेमिस्टर असणार आहेत. यामध्ये फायनान्स, मार्केटिंग, एचआर, असे विविध विभाग आहेत. सरकारच्या नियमानुसार स्कॉलरशीप विद्यार्थ्यांना दिले जाईल. 3) MMS कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना CET द्यावी लागणार आहे. ही डायरेक्टर रेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनतर्फे घेण्यात येते. परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. हा कोर्स 2 वर्षांचा आहे. 4 सेमिस्टरचा हा कोर्स आहे. फायनान्स, मार्केटिंग, ऑपरेशन, एचआर, असे विषय असून 8 पेपर विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत. या कोर्सची फी 2 लाख आहे, प्रत्येक 1 लाख अशी आहे. विद्यार्थ्यांची संख्या 120 इतकी आहे. तसेच आरक्षणानुसारही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. वाचा :
Aurangabad : 4 लाख ते 85 लाखांपर्यंत पॅकेज असणारा जाॅब मिळू शकतो; फक्त ‘हा’ कोर्स करावा लागेल, कसा कराल अर्ज?
विद्यार्थ्यांना कोणत्या सोयी-सुविधा मिळणार? या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात वसतिगृहाची सुविधा मिळणार आहे. तसेच प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, प्रशस्त क्लासरूम, ऑनलाईन रिसोर्सेस, ऑफलाइन रिसोर्सेस, बुक्स, इंटर्नशीप, अशा विविध सोयी-सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. किती लाखांचं पॅकेज मिळणार? विद्यार्थ्यांना या कोर्सनंतर ॲक्सिस बँक, बर्जर पेंट्स, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय, टाइम्स ग्रुप ,आदित्य बिर्ला सन लाइफ या बड्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंटद्वारे जाॅब उपलब्ध करून दिले जातील. तसेच विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये भरपूर स्कोप आहे. विविध प्रकारच्या कंपनीमध्ये जॉब ची संधी आहेत. सर्वसाधारणपणे भविष्यामध्ये सरासरी वार्षिक 4 लाख 39 लाख इतका पगार मिळेल. अनुभवानुसार हा पगार वाढतो.
गुगल मॅपवरून साभार…
कोर्ससंबंधी कसा संपर्क साधाल? जोरावर भवन, सरोज सदनच्या मागे, विद्यापीठ परिसर, विद्या नगरी, सांताक्रूझ (पू), मुंबई 400098 या पत्त्यावर विद्यार्थी संपर्क करू शकतात. तसेच https://admi.mu.ac.in/ या वेबसाईटवरही आपला फाॅर्म भरू शकतात. 8655339396 या क्रमांकावर किंवा director@admi.mu.ac.in यावर ईमेल करू शकतात.