कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात 3 झोन, तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये पाहा

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात 3 झोन, तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये पाहा

कोरोनाशी लढण्यासाठी राज्य तीन झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचा समावेश आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. यातच सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत असेल असंही जाहीर केलं आहे. दरम्यान, कोरोनाशी लढण्यासाठी राज्य तीन झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचा समावेश आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांची या तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, झोनबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्याचा निर्णय केंद्राकडून गाइडलाइन आल्यानंतर घेतला जाईल. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये नेमकं काय शिथिल केलं जाईल याबद्दल अजुन माहिती मिळालेली नाही.

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन म्हणजे काय?

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले जिल्हे रेड झोनमध्ये असतील. याठीकाणी निर्बंध कडक राहतील. तर ऑरेंज झोनमध्ये 15 पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या असेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. तर ग्रीन झोनमध्ये सर्वात कोरोनाचे रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल.

देशातील जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी कऱण्याच्या प्लॅनबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली होती. त्यात मोदी म्हणाले होते की, रेड झोनमध्ये पूर्ण लॉकडाऊन असेल तर ग्रीन झोनमध्ये निर्बंध थोडे शिथिल केले जातील. बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंधित करून, स्थानिक रोजगार उपक्रम पूर्वीप्रमाणेच चालविण्यास परवानगी दिली जाऊ शकते. तर ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांच्या सरकारी कार्यालयांमध्ये काम सुरू होण्याची शक्यता आहे.

तीन झोननुसार जिल्ह्यांची विभागणी

राज्यात रेड झोनमध्ये 8 जिल्हे आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.

ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा प्रभाव मध्यम असलेल्या जवळपास 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया हे जिल्हे आहेत.

आतापर्यंत कमी कोरोना रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. राज्यात 9 असे जिल्हे आहेत जिथं अजुन कोरोनाचा फारसा प्रभाव नाही. यामध्ये धुळे, नंदूरबार, सोलापुर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत.

हे वाचा : अवघ्या 4 दिवसांत 80 जिल्ह्यांत पोहोचला कोरोना, अर्ध्या भारतात फैलाव

राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. मी सर्व लोकांना आवाहन करतो की तुम्ही घरातच रहा. खूपच महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाचा : केरळमध्ये अर्ध्याहून जास्त कोरोनाग्रस्त झाले ठणठणीत, रविवारी फक्त 2 नवे रुग्ण

First published: April 13, 2020, 11:19 PM IST

ताज्या बातम्या