मालेगावात कोरोनामुळे हाहाकार, 3 महिन्यांच्या चिमुकलीसह 43 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

मालेगावात कोरोनामुळे हाहाकार, 3 महिन्यांच्या चिमुकलीसह 43 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई, पुण्यानंतर मालेगावत सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 253 रुग्णांवर इथे उपचार सुरू आहेत.

  • Share this:

मालेगाव, 30 एप्रिल : राज्यात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. नाशिकमध्ये कोरोनाचं थैमान सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ मालेगाव शहर हॉटस्पॉट झालं आहे. बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार मालेगाव शहरात 44 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 3 महिन्यांच्या नवजात शिशुचा सामावेश आहे. यासोबत 2 वर्षांचा मुलगा आणि 12 पोलिसांचाही समावेश आहे. अत्यावश्यक सेवा आणि आपली जीव धोक्यात घालून अहोरात्र ड्युटी करणाऱ्या 12 पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. चिंतेची बाब म्हणजे 24 तासांत मालेगावात 82 रुग्णांची भर पडली आहे.

मुंबई, पुण्यानंतर मालेगावत सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 253 रुग्णांवर इथे उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग इथे वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा फैलाव झपाट्यानं वाढत असल्यानं प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

राज्यात मंगळवारी कोरोनाबाधित 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 झाली आहे. राज्यात बुधवारी एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातले सर्वाधिक 26 मृत्यू मुंबईत झाले आहेत. सध्या राज्यात 1,62,860 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 10,813 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली. आजपर्यंत 1593 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 30, 2020, 9:14 AM IST

ताज्या बातम्या