जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अभिमानास्पद! संकटकाळात महाराष्ट्रवासीयांची एकजूट, डोंबिवलीच्या मदतीला धावले नाशिककर

अभिमानास्पद! संकटकाळात महाराष्ट्रवासीयांची एकजूट, डोंबिवलीच्या मदतीला धावले नाशिककर

अभिमानास्पद! संकटकाळात महाराष्ट्रवासीयांची एकजूट, डोंबिवलीच्या मदतीला धावले नाशिककर

संकटाच्या काळात महाराष्ट्र एकजुटीने उभा असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

डोंबिवली, 29 मार्च : जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसं संकट महाराष्ट्रातही गडद होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती काहीशी चिंताजनक होत आहे. मात्र याच संकटाच्या काळात महाराष्ट्र एकजुटीने उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत जंतुनाशक फवारणी करण्यासाठी नाशिकच्या शेतकऱ्यांनी पाच लहान फवारणी ट्रॅक्टर कल्याण-डोंबिवली पालिकेला उपलब्ध करून दिले आहेत. नाशिकमधून आणलेल्या एका ट्रॅक्टरच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेत फवारणी सुरू करण्यात आली आहे, असे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, डोंबिवलीतील रहिवासी नाशिकचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

News18

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये पालिकेच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी स्वत:चे ट्रॅक्टर जंतूनाशक फवारणी करण्यासाठी रस्त्यावर उतरविले होते. चार ते पाच दिवसात या मोहिमेमुळे नाशिक शहराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. ही मोहीम आपल्या कल्याण, डोंबिवली शहरात वापरावी म्हणून प्रायोगिक तत्वावर नाशिकहून एक ट्रॅक्टर फवारणीसाठी डोंबिवलीत आणण्यासाठी भाऊसाहेब चौधरी यांनी कडोंमपाचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे परवानगी मागितली होती. आयुक्तांनीही या योजनेची उपयुक्तता पाहून ट्रॅक्टर आणण्यास परवानगी दिली. तसेच एकूण पाच ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडून कसे उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार चौधरी यांच्या प्रयत्नांतून कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी पाच आणि उल्हासनगर पालिकेसाठी दोन ट्रॅक्टर नाशिकच्या शेतकऱ्यांकडून मिळवण्यात यश आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात