Home /News /maharashtra /

Covid-19 Updates: पुण्यात धोका कायम; राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण कमी, पण 24 तासांत 50 बळी

Covid-19 Updates: पुण्यात धोका कायम; राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण कमी, पण 24 तासांत 50 बळी

कोरोनारुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. त्यातच आता कोरोनाव्हायरसचं नवं स्वरूप उजेडात आलं आहे आणि ब्रिटनमध्ये त्याचे रुग्ण सापडले आहेत. पुण्याचा धोका आणखी वाढण्यामागे तेसुद्धा एक कारण आहे.

    मुंबई, 28 डिसेंबर: राज्यात (Maharashtra Coronavirus Updates) कोरोनाच्या नव्या रुग्णांची आकडेवारी कमी होत असली, तरी कोरोना बळींची संख्या कायम आहे. गेल्या 24 तासांत 50 जणांचा कोरोना व्हायरसमुळे (Covid-19 deaths) मृत्यू झाला आहे.  कोरोनारुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यातली रुग्णसंख्या देशात सर्वाधिक आहे.  त्यातच आता कोरोनाव्हायरसचं नवं स्वरूप उजेडात आलं आहे आणि ब्रिटनमध्ये त्याचे रुग्ण सापडले आहेत. पुण्याचा धोका आणखी वाढण्यामागे तेसुद्धा एक कारण आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. हा नवा विषाणू आधीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. याच इंग्लंडमधून पुण्यात आलेल्या प्रवाशांपैकी पुन्हा एकदा 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडमधून पुण्यात परत आलेल्यांची संख्या 638 वर पोहोचली आहे. मात्र त्यातील 106 जणांचा पत्ताच सापडत नसल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत आरोग्य विभागाने पुणे पोलिसांना तपासासाठी पत्र दिलं आहे. Coronavirus चं गंभीर रूप देशासमोर आलं त्याला बरोबर 9 महिने उलटले आहेत. मोदींनी देशव्यापी Lockdown 25 मार्चला जाहीर केला होता. या जागतिक महासाथीने महाराष्ट्रात सर्वाधिक बळी घेतले आहेत. अनेक घरांनी या साथीत आप्त गमावले आहेत.. पाहा धक्कादायक आकडेवारी आतापर्यंतची आकडेवारी राज्यातली कोरोना रुग्णांची आजपर्यंतची संख्या 19,22,048 आतापर्यंतचे कोरोना बळी - 49305 गेल्या 24 तासांत राज्यात झालेले मृत्यू - 50 आजच्या घडीला उपचाराधीन रुग्णसंख्या - 57159 गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना निदान झालेले रुग्ण - 2,498 राज्याचा मृत्यूदर - 2.57%
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या