कोव्हिड सेंटरमध्येच केली गळफास घेऊन आत्महत्या, कोरोनाच्या भीतीमुळे उचललं टोकाचं पाऊल

कोव्हिड सेंटरमध्येच केली गळफास घेऊन आत्महत्या, कोरोनाच्या भीतीमुळे उचललं टोकाचं पाऊल

कर्मचाऱ्यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत हा व्यक्ती आढळून आला.

  • Share this:

बीड, 12 जुलै : कोरोनाच्या संशयित रुग्णाने कोव्हिड सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. गेवराई शहरातील कोव्हिड सेंटरमध्ये क्वारन्टाइन असलेल्या तुकाराम जगन्नाथ जाधव वय 35 असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

आत्महत्या केलेल्या सदर व्यक्तीचा स्वॅब शुक्रवार घेण्यात आला होता. त्याचा अहवाल येण्या आधीच त्याने क्वारन्टाइन सेंटरमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीने तुकाराम जाधव यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

ज्यावेळी तेथील न.प.कर्मचाऱ्यांनी त्यांचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले तेव्हा दार न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत हा व्यक्ती आढळून आला. त्यानंतर दरवाजा तोडून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कल्याणमध्येही अशीच एक घटना घडली होती. कोरोनाच्या भीतीमुळेच मलंगगड पट्ट्यात मत्स्य विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने काकडवाल गावातील स्मशानभूमीत गळफास लावून आत्महत्या केली. कोरोना विषाणूमुळे ते घाबरून गेले होते आणि त्यांनी रात्रीच्या अंधारात आपले जीवन संपवलं.

कोरोनानं आता ग्रामीण भागात देखील शिरकाव करल्याने नागरिकांमध्ये गैरसमज अधिकच वाढले आहेत. कल्याण जवळील मलंगगड येथील काकडवाल गावातील एक व्यक्ती आजारी होता आणि त्या व्यक्तीने स्वतःला होमक्वारन्टाइन करून सुद्धा घेतले होते. तसंच कोरोनाची चाचणी देखील केली होती. मात्र त्याचा रिपोर्ट येण्याआधीच त्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

First published: July 12, 2020, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading