Home /News /maharashtra /

कोरोनाचं संकट वाढत असताना पुणे जिल्ह्यात समोर आला खळबळजनक प्रकार

कोरोनाचं संकट वाढत असताना पुणे जिल्ह्यात समोर आला खळबळजनक प्रकार

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

ठाणे, 21 मे : सुरुवातीला पुणे शहरापुरता मर्यादित असलेला कोरानाचा प्रादुर्भाव आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, हवेली यांसारख्या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. अशातच जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने विवाह सोहळ्याना अटीशर्ती घालून परवानगी दिलेली आहे . मात्र या अटीशर्तीचे पालन न करता दोन सुशिक्षित घरातील व्यक्तींनी विवाहसोहळा आयोजित करून वर आणि वधुसह वऱ्हाडी मंडळींचा जीव देखील धोक्यात घातला आहे . जुन्नर तालुक्यातील वडगाव- आनंद या गावात हा प्रकार घडला आहे. सनई ,चौघड्याच्या तालात , भटजींच्या सूचनेनुसार विधीवत आणि वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने सुशिक्षित जोडपं प्रथमेश वाळुंज आणि श्रुतिका देवकर हे दोघे 19 मे रोजी थाटामाटात विवाहबंधनात अडकले. प्रथमेश आणि श्रुतिका तसेच विवाहसोहळ्यात येणारा प्रत्येक जण देखील सुशिक्षित. मात्र सर्वांनीच सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवून आणि मास्क न वापरून अशिक्षितपणा दाखवला आहे. केवळ इतकंच नाही तर लग्नाच्या केवळ 3 दिवस आधी नवी मुंबईहून आपल्या गावी गेलेल्या प्रथमेशने स्वतःला क्वारन्टाइन न करता विवाह सोहळ्याच्या आधीची हळद आणि इतर शुभकार्य देखील नियम न पाळता उरकून घेतली. लॉकडाऊन काळातील सरकारी नियमानुसार मर्यादित 50 लोकांच्या उपस्थित लग्न करता येतं. मात्र या लग्नाला येणारे वऱ्हाडी जास्त संख्येने तर होतेच, परंतु विशेष म्हणजे मास्क न घालता सोशल डिस्टन्सिंग न पाळता विवाहसोहळ्यात सहभागी देखील झाले. राज्य सरकार कोरोना सारख्या महामारीच्या काळात रुग्णांची वाढती संख्या रोखून धरण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र अशा पद्धतीने जर नियम डावलून विवाह सोहळे आणि इतर कार्यक्रम होत राहिले तर राज्य सरकारचे प्रयत्न अपयशी ठरतील आणि नकळत अशा कार्यक्रमातून कोरोना आणखी संक्रमण वाढेल. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या विवाहसोहळ्या बाबत माहिती मिळाल्यानंतर तरी स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभाग कारवाई करेल का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. यानिमित्ताने निर्माण झालेले काही प्रश्न : 1.नवरा मुलगा नवी मुंबईवरून गावी आला पण नियमानुसार 14 दिवस क्वारन्टाइन राहिला नाही. असे असताना ग्रामपंचायतीने परवानगी दिली कशी? 2. नवरा मुलगा व नवरी मुलगी यांनी मास्क वापरले नाहीत. 3.लग्न सोहळ्यात 150पेक्षा अधिक लोकं उपस्थित होते. 4. उपस्थित लोकांनी सोशल डिस्टंसिंग पाळले नाही. 5. अनेक जणांनी मास्क वापरले नाहीत. दरम्यान, या लग्नसोहळ्याची मोठी चर्चा झाल्यानंतर आता आळेफाटा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. कलम 269 आणि 270 नुसार बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, बेजबाबदारपणा, 32 ( पोलिस कायद्याचे उल्लंघन करणे ) याप्रकरणी जवळपास 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या