सणासुदीच्या कालावधी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. राज्यात कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला टेन्शन आलं आहे.
कोरोनाची तिसरी लाट आपल्या उंबरठ्यावर आहे. केरळमध्ये दररोज 30,000 प्रकरणं आढळत आहेत. ही धोक्याची घंटा आहे. जर आपण गांभीर्याने घेतलं नाही तर महाराष्ट्राला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
गर्दीमुळे राज्यात कोरोनाची प्रकरणं वाढू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम, सभा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
सण आणि धार्मिक कार्यक्रमात कुणाला निर्बंध ठेवायला आवडतील. पण नागरिकांचं आयुष्य महत्त्वाचं आहे. नागरिकांचं आजीव ही प्राथमिकता आहे. उत्सव नंतर साजरे करता येऊ शकतात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ऑक्सिजन कमी असलेल्या संपूर्ण देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं हे लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं.
कोरोनाची दैनंदिन प्रकरणं पाहता परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सणासुदीचे दिवस हे महत्त्वाचे आणि आव्हानात्मक आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी.
जर प्रत्येकाने मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग, गर्दीच्या ठिकाणी न जाणं अशा कोरोना नियमांचं पालन केलं तर नव्या निर्बंधांची गरज पडणार नाही.