मुंबई, 29 मे : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही माहिती समोर आली. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये फेरबदल होऊ शकतात. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री सतेज पाटील आणि प्रदेश माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यामध्ये अशोक चव्हाण यांचे पारडे जड मानले जात आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले होते. तसेच यापूर्वीही त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते काँग्रेसमधील जनाधार असलेले सर्वात मोठे नेते मानले जातात. कर्नाटकनंतर काँग्रेसचे मिशन मध्य प्रदेश, राहुल गांधींनी सांगितलं किती जागा मिळणार? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांच्यासह एक शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडला भेटलं. काँग्रेसला जर राज्यात वाचवायचं असेल तर नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावं अशी मागणीही त्यांनी हायकमांडकडे केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं. आपण दिल्लीला गेलो होतो, मात्र ती सदिच्छा भेट होती असं त्यांनी म्हटलं. सत्यजित तांबे दिसताच आजीबाई धावल्या अन्…,पहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष हे पक्षाचं राज्यातील सर्वोच्च पद असतं, त्यामुळे त्याबाबत आपल्याला बोलायचं नाही. मात्र एवढं नक्की की सर्वांनी मिळवून मिसळून कामं केलं तर पक्षाची कामगिरी अधिक चांगली होईल, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी पटोलेंचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. थोरातांचीही नाराजी विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबेंच्या बंडावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातही नाना पटोले यांच्यावर नाराज झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.