मुंबई, 14 ऑगस्ट : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपाच्या मार्गावर असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. अशातच आज काँग्रेसच्या एका आमदाराची अशीच चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तित भेट घेतली आहे.
सह्याद्री अतिथीगृह इथं पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण या भेट घेऊन काँग्रेसचं शिष्टमंडळ परतल्यानंतरही आमदार भारत भालके हे मुख्यमंत्र्यांसोबतच राहिले. स्वतःची वैयक्तिक काम काम असल्याने ते स्वतंत्ररित्या मुख्यमंत्र्यांना भेटले.
बाळासाहेब थोरातांची गुगली
मुख्यमंत्र्यांसोबत वैयक्तिक भेट घेऊन बाहेर आल्यानंतर भारत भालके यांची बाळासाहेब थोरांतांशीही भेट झाली. यावेळी 'भालके आहात कुठे? आजकाल दिसत नाहीत' असं म्हणत थोरातांनी गुगली टाकली. मात्र यावर आमदार भालके यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, भारत भालके हे गेले काही दिवस भाजपाचे नेत्यांसमवेत संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात मुख्यमंत्री फडवणीस पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त गेले होते, त्यावेळी भालके यांनी मुख्यमंत्र्यांना आवर्जून स्वतःच्या घरी नेले. त्यानंतर भालके भाजपात जाणार याची जोरदार चर्चा रंगली.
काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना-भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. 10 ऑगस्टला आघाडीतील काही मोठ्या नेत्यांचा भाजपप्रवेश देखील होणार होता. परंतु पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे हा पक्षप्रवेश तूर्तास लांबणीवर पडला आहे.
असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.