जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सावरकरांवरून मुख्यमंत्र्यांचं राहुल गांधींना प्रत्युतर, शिंदेंचा नवा डीपी बघितलात का?

सावरकरांवरून मुख्यमंत्र्यांचं राहुल गांधींना प्रत्युतर, शिंदेंचा नवा डीपी बघितलात का?

एकनाथ शिंदे यांनी बदलला डीपी

एकनाथ शिंदे यांनी बदलला डीपी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. राहुल गांधींच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. राहुल गांधींच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी त्यांच्या जाहीर सभेतून राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपनेही राहुल गांधींवर टीका करताना उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगू लागलेलं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सावरकर गौरव यात्रा सुरू करणार असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेमध्य एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधतानाच उद्धव ठाकरे यांनाही डिवचलं. ‘एक दिवस तरी…’, सावरकरांवरून मुख्यमंत्र्यांचं राहुल गांधींना चॅलेंज, ठाकरेंनाही डिवचलं शिवसेना नेत्यांनी बदलले डीपी दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवेसेनेच्या नेत्यांनी त्यांचे सोशल मीडियावरचे डीपी बदलले आहेत. शिवसेना नेत्यांनी सावरकरांचे फोटो डीपीवर ठेवत ‘आम्ही सारे सावरकर’ असं या फोटोंवर लिहिण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी सावरकरांचे हे फोटो डीपी म्हणून ठेवले आहेत.

News18

काय म्हणाले मुख्यमंत्री? ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. याचा मी निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाणीवपूर्वक अपमान केला जातोय. राहुल गांधी यांनी एक दिवस अंदमान निकोबारच्या जेलमध्ये राहून दाखवावं. राहुल गांधी यांचा निषेध सर्वांनी करायला हवा. तुम्ही म्हणता मी गांधी आहे, सावरकर नाही. तुमची लायकी सुद्धा नाही, सावरकर होण्याची,’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात