जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनंतर राष्ट्रवादीला धक्का, जिल्हाध्यक्षाचा कार्यकर्त्यांसह प्रवेश!

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनंतर राष्ट्रवादीला धक्का, जिल्हाध्यक्षाचा कार्यकर्त्यांसह प्रवेश!

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनंतर राष्ट्रवादीला धक्का, जिल्हाध्यक्षाचा कार्यकर्त्यांसह प्रवेश!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेनंतर (Shivsena) आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) वळवला आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला पहिला धक्का दिला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेनंतर (Shivsena) आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP)  वळवला आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला पहिला धक्का दिला आहे. दक्षिण मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय वाडकर शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. विजय वाडकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही शिंदेंच्या गटात प्रवेश करतील. दुसरीकडे उस्मानाबादमध्येही शिंदेंनी शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या नंदनवनमध्ये रवींद्र गायकवाड यांनी भेट घेऊन शिंदेंना पाठिंबा दर्शवला. रवींद्र गायकवाड उस्मानाबादचे खासदार असतानाही त्यांना तिकीट न देता ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली होती. गायकवाड यांनी याआधीही ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. रवींद्र गायकवाड यांचा योग्य सन्मान केला जाईल, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याची माहिती आहे.

जाहिरात

रायगडमध्ये खिंडार रायगडमध्येही युवा सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष विपुल उभारे, युवासेना अधिकारी वैभव मोरे, विभाग प्रमुख योगेश बक्कम, युवासेना समन्वयक श्रीराम कळंबे यांचा यात समावेश आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेतृवाची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या जवळीकीला कंटाळून आपण शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले. नांदेडमधूनही इनकमिंग नांदेड उत्तर मतदारसंघातूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हसापूर, नसरतपूर आणि तळनी, तरोडा या गावातील कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीमध्ये चार सरपंच आणि कार्यकर्ते शिंदे गटात आले. याआधी दोन जिल्हाप्रमुख आणि चौदा तालुका प्रमुखांनीही शिंदेंना पाठिंबा देत प्रवेश केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात