बोंड अळीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची आज बैठक

बोंड अळीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची आज बैठक

कपाशीवर प्रादुर्भाव झालेल्या बोंड अळीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत.

  • Share this:

17 डिसेंबर : कपाशीवर प्रादुर्भाव झालेल्या बोंड अळीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते  शरद पवार यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

बोंड अळी संदर्भातल्या या महत्त्वाच्या बैठकीला नितीन गडकरीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चर्चेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल असं दिसतंय.

गेल्या अनेक दिवसांपासून न्यूज 18 लोकमतने महाराष्ट्रभर बोंड अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या सत्यतेवरून जाब विचारत खरंच कर्जमाफी झाली आहे का? असा सवालही उपस्थित केला होता. तर दुसरीकडे कापसाच्या बोंड अळी संदर्भातील लक्षवेधी पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले, शिवसेनेतल्या हर्षवर्धन जाधवांनीही याविरुद्ध ठिय्या आंदोलन केलं होतं.

दरम्यान बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीत ट्रॅक्टर फिरवला  होता. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनीही उभ्या कपाशीत ट्रॅक्टर फिरवून सरकारच्या धोरणाचा निषेध केला होता. कापूस वेचणीची मजुरीही परवडत नसल्यानं सरकारनं बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारांची मदत करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.

बोंड अळीच्या गंभीर प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही याबाबत सरकारने दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणीही विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटिल यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या सगळ्या आंदोलनांना आणि प्रश्नांवर मुख्यमंत्री काय उत्तर देतील आणि या सगळ्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का? या समस्येवर काय तोडगा निघतो हे बघणं आता  महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: December 17, 2017, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading