मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Bullet Train : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बांधकामे पाडून बुलेट ट्रेनसाठी जमीनीचा ताबा घेतला, पीएम मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

Bullet Train : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बांधकामे पाडून बुलेट ट्रेनसाठी जमीनीचा ताबा घेतला, पीएम मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

ठाणे शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या जमीनीचा ताबा घेण्याची आज अंतीम तारीख होती. त्याची गांभीर्याने दखल घेत अतिक्रमण, निवासी घरे, गाळे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 30 सप्टेंबर : मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला आहे. या मार्गासाठील लागणाऱ्या जमीनींचा ताबा घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान ठाणे शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या जमीनीचा ताबा घेण्याची आज अंतीम तारीख होती. त्याची गांभीर्याने दखल घेत अतिक्रमण, निवासी घरे, गाळे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आली आहेत. यामध्ये १२ बांधकामे ही चार सर्वे नंबरमधून तोडली. बुलेट ट्रेनकरिता लागणाऱ्या जमिनीचा ताबा संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी देण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी जातीने हजर राहत जमीनीचा ताबा घेतला.

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग ठाणे शहरातून जाणार आहे. दरम्यान प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा खुला ताबा नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशनला 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे आज(दि.30) देण्याचे आदेश जारी झाले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत अतिक्रमण, निवासी घरे, गाळे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. यामध्ये १२ बांधकामे ही चार सर्वे नंबरमधून तोडली. बुलेट ट्रेनकरिता लागणाऱ्या जमिनीचा ताबा संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला.

हे ही वाचा : ‘या’ काळात पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग राहणार बंद, असा असेल पर्यायी मार्ग

मुंबई- अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्राेजेक्ट मानला जातो. यामुळे ठाणे जिल्ह्यातील 22 हेक्टर 48 आर जमिनीचे 100 टक्के भूसंपादन गुरुवारी पूर्ण करण्यात आले. जमिनीचा ताबा देखील नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला दिला. 

त्यासाठी मौजे आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शिळ व देसाई आदी ठिकाणचे अतिक्रमण तत्काळ पाडून बुलेट ट्रेनचा मार्ग सुकर केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी लोकमतला दिली.

हे ही वाचा : नवी मुंबई आणि ठाण्यासह या महत्त्वाच्या शहरातील IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

या रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीच्या भोगवटादारांकडून जमिनी घेऊन त्या बुलेट ट्रेन प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रकल्पाच्या समिती प्रमुखांसह नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, ठाणे समिती उपप्रमुख, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आदी यंत्रणा या गावांमध्ये तैनात करून जागा मोकळी केल्याचे शिंदे यांनी सांगितले. या रेल्वे प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूखंडावर वसलेल्या रहिवाशांकडून प्रशासनाला कडाडून विरोध झाला. मात्र, पोलीस बळाचा वापर करून यावर मात केली.

First published:

Tags: Bullet, Bullet train, Cm eknath shinde, Thane, Thane (City/Town/Village)