मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /''आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करावं'', राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजे संतापले

''आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करावं'', राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजे संतापले

File Photo: Twitter

File Photo: Twitter

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhonsle) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सातारा, 28 फेब्रुवारी: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी 'समर्थ रामदास' यांच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना कुणी विचारलं असतं? असं वक्तव्य केलं. राज्यपालांच्या विधानावर आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद उफाळला आहे. आता खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle )यांनी देखील राज्यपालांवर टीका केली आहे.

खासदार उदयनराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यपालांवर टीका केली आहे. उदयनराजे यांनी आपल्या पोस्ट म्हटलं की, राष्ट्रमाता जिजाऊ (Jijau) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

पुढे त्यांनी म्हटलं की, खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.

काय म्हणाले राज्यपाल

'आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्यामध्ये संकल्प पूर्ण कऱण्यासाठी समर्थ रामदास यांच्यासारखे गुरू मिळाले होते. राजा, महाराज, या सर्वांना गुरू होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्तला कोण विचारणार होतं. समर्थ यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार होतं' असं राज्यपाल म्हणाले. तसंच, 'शिवाजी महाराज हे काही चंद्रगुप्त इतके लहान नाही परंतु, त्यांच्या पाठीमागे जसा आईचा हात होता, तसेच गुरू उभे होते. समाजामध्ये गुरूचे मोठे स्थान आहे' असंही राज्यपाल म्हणाले.

First published:

Tags: Governor bhagat singh, Udyanraje Bhosle