छत्रपती संभाजीनगर, 26 जुलै: तंत्रज्ञानाच्या मोहजाळात गुंग होऊन सध्याची पिढी सर्वसामान्यांसह इतरांसोबतही संवाद हरवून बसली आहे. सोबत बसलेले लोक सध्या मोबाईल आणि लॅपटॉप वरचं गुंग होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे कौटुंबिक आणि मित्र परिवारातील दुरावे वाढण्याला तंत्रज्ञान कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तरुणांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे अँड्रॉईड मेनिया आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. लॉकडाऊन पूर्वी मानसोपचार तज्ज्ञांकडे महिन्याला येणाऱ्या 100 रुग्णापैकी 15 रुग्ण अँड्रॉईड मेनिया आजाराची लक्षणे असलेली होती. आता हे प्रमाण 30 ते 35 वर आले आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर शहरामधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी दिली आहे. काय कारण? सध्या स्वस्तात आणि सहज उपलब्ध झालेले तंत्रज्ञान गरजेपेक्षा व्यक्तीची सवय बनत आहे. त्यामुळे पूर्वीसारखे एकमेकांच्या सुखा दुःखामध्ये सहभागी होण्याचे दृश्य दुर्मिळ होताना पाहायला मिळत आहे. त्यात तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुःखही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा ट्रेंड सध्या चालू आहे. ऑनलाइन गेमिंग तरुण वर्ग सध्या मोठ्या प्रमाणात खेळत आहे. त्यामुळे या जीवनशैलीचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावरती पाहायला मिळत आहे.
आत्मीयता, संवेदनशीलता आणि एकमेकांवरील विश्वासाचे नाते हरवल्याने स्वसंवादासह कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी प्रत्यक्ष तरुणाई हरून बसल्याने अँड्रॉइड मेनिया संख्या वाढत आहे.त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होत यावर नियंत्रणासाठी प्रयत्न करावा आणि प्रत्यक्ष संवादावरती भर द्यावा, असं डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले.
Women Health : महिलांच्या 3 गंभीर समस्यांवर रामबाण उपाय आहे मेथी, त्वचेसोबत संपूर्ण आरोग्य सुधारेल!
यावर काय आहे उपाय? मोबाईलसाठी एक ठराविक वेळ हा तरुणांनी द्यायला पाहिजे. त्याचबरोबर एकमेकांमधील संवाद वाढावा विशेषतः रात्री जास्त मोबाईलचा वापर करू नये. यामुळे आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, असंही डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले.