जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, पाहा कसा असावा आहार?

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, पाहा कसा असावा आहार?

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, कसा असावा आहार?

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, कसा असावा आहार?

Weight Loss Tips: वजन वाढ ही अनेकांची समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी कसा असावा आहार? पाहा खास टिप्स

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 9 जुलै: आजकाल वजन वाढ ही अनेकांची समस्या झालेली आहे. प्रत्येक जण आपल्या आरोग्याबाबत आणि वाढत्या वजनाबाबत चिंतेत असतो. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आहार, व्यायाम, औषधोपचार याचा विचार करत असतो. पण वजन कमी करण्यासाठी नेमका आहार कसा असावा? आणि दिनचर्या कशी असावी? याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. याविषयीच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे. कोणताही अतिरेक नको सर्वप्रथम वजन कमी करताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. जसे जीमला जात आहे तर जास्त वेळ व्यायाम केला की वजन कमी होतं, असा काही जणांचा गैरसमज असतो. किंवा फक्त फ्रुट खाल्ल्याने वजन कमी होतं असंही काहींना वाटतं. पण असं नसून वजन कमी करण्याची योग्य पद्धतीचा विचार करायला हवा. आहार आणि व्यायाम यांचं संतुलन राखता आलं पाहिजे, असं कर्णिक सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

असा असावा व्यायाम वजन कमी करताना आपण कमीत कमी दिवसभरात 5 हजार पावले चालायला पाहिजे. जेणेकरून आपलं वजन कमी व्हायला मदत होते. दररोज प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार करायला पाहिजे. विशेष म्हणजे सर्व गोष्टींमध्ये सातत्य पाहिजे. तरच आपण वजन कमी करू शकतो. जर यात खंड पडला तर वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू शकतं. त्याचबरोबर वजन कमी करताना आपला आहार सर्वात महत्त्वाचा घटक असतो, असं आहार तज्ज्ञ सांगतात. कसा असावा आहार? सर्वप्रथम प्रथिने, व्हिटॅमिन, फायबर, प्रोटीन या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा. जेणेकरून आपल्याला वजन कमी करताना मदत होते. सर्वप्रथम आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारामध्ये लिंबूचा समावेश करावा. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यामध्ये एका लिंबाचा चौथा भाग पिळून ते पाणी दररोज पिल्याने वजन कमी व्हायला मदत होते. जास्त पण लिंबू पिळायचं नाही. जास्त तसं केल्यास त्याचा दुष्परिणाम होतो, असं कर्णिक सांगतात. Weight Loss Tips : वजन कमी करायचं असेल तर चुकूनही खाऊ नका हे फूड कॉम्बिनेशन्स भाज्यांचा करावा वापर आपल्या आहारामध्ये भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. पालेभाज्या, बिया असणारा भाज्या आदी पदार्थांचा जास्तीत जास्त आहारामध्ये समावेश करावा. विशेषतः सकाळच्या जेवणामध्ये आपण सलाड खायला पाहिजे. जेवताना रोज तोंडी लावण्यासाठी चटणीचा वापर करावा. त्याच्यामध्ये जवस, कारळं, शेंगदाणे अशा चटण्यांचा वापर आपण आपल्या जेवणामध्ये करायला पाहिजे. आपले वजन 50 किलो असल्यास 50 ग्रॅम प्रोटीन घेणे गरजेचे आहे. आहारामध्ये जास्तीत जास्त फळांचं खाणं आवश्यक आहे. यामुळे सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते, असे कर्णिक यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात