मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : संभाजीनगरमध्ये पोलिसांची गुंडगिरी? वाहनचालकाला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण

Video : संभाजीनगरमध्ये पोलिसांची गुंडगिरी? वाहनचालकाला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण

संभाजीनगरमध्ये पोलिसांची गुंडगिरी?

संभाजीनगरमध्ये पोलिसांची गुंडगिरी?

संभाजीनगरमधील क्रांती चौकात वाहतूक पोलिसांच्या मुजोरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका दुचाकीस्वाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chhatrapati Sambhaji Nagar, India

संभाजीनगर, 20 मे : देशांतर्गत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असते. मात्र, अनेकदा पोलीस आपल्या अधिकारांचा गैरवापर करताना पाहायला मिळतात. याच अधिकारांच्या जोरावर सर्वसामान्यांवर मुजोरी केल्याची घटना घडतात. अशीच एक घटना संभाजीनगर शहरात समोर आली आहे. वाहतूक पोलीस एका दुचाकी चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. ही घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

काय आहे प्रकरण?

संभाजीनगर शहरात वाहतूक पोलिसांच्या गुंडगिरीचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. क्रांती चौकात एक दुचाकीवाहन धारकाला वाहतूक पोलीस लाथा बुक्क्यांनी मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तरुणाची चूक फक्त सिग्नल जंप करणे होती. मग वाहतूक पोलिसांना मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस खाते काय कारवाई करते हे पहावे लागेल.

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना

आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मुलीच्या वडिलांनी लोखंडी दांड्यानं जबर मारहाण केली, या घटनेत आरोपीचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका गावात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली असून, त्यांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दळण दळण्यासाठी जात असलेल्या एका 17 वर्षीय मुलीचे ओढणीने तोंड दाबून तिला पत्र्याच्या शेडमध्ये नेत तिच्यावर तीस वर्षीय आरोपीकडून अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. मुलीने आरडाओरड केल्यानं घटनास्थळापासून जवळच असलेल्या आई-वडिलांनी घटनास्थळाकडे धाव घेत आपल्या मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.

First published:
top videos

    Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Traffic police