अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 13 जून : दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरु आहे. त्यामुळे सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रेवश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यलामध्ये पॉलिटेक्निक या अभ्यासक्रमाची सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. कशी असेल प्रेवश प्रक्रिया? पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली असून ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यासाठी ऑनलाईन पद्धतीने होणारं आहे. विद्यार्थी हे प्रेवश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ही प्रवेश प्रक्रिया 21 जून पर्यंत चालणार आहे.
या कोर्ससाठी घेऊ शकता प्रेवश 1) ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग 2) सिव्हिल इंजिनिअरिंग 3) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 4) ड्रेस डिझाईन आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ( फक्त मुलींसाठी) 5) इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग 6) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिककम्युनिकेशन इंजिनिअरिंग 7) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 8) मेकॅनिकल इंजिनिअरिंग 9) आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग काय कागदपत्र लागतील? 1) दहावी आणि बारावीचे मार्कशीट. 2) जन्माचा दाखला 3) उत्पन्नाचे प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5) भारतीय राष्ट्रीय तत्व प्रमाणपत्र 6) डोमेसाईल प्रमाणपत्र 7) नॉन क्रिमिनल 8) टी. सी.
प्रवेश शुक्ल किती असेल? प्रथम वर्ष दहावीनंतर ओपन साठी 400 रुपये असेल तर राखीव वर्गासाठी 300 रुपये प्रवेश शुक्ल असणार आहे. बारावीनंतर प्रथम वर्षासाठी ओपन साठी 400 असेल तर राखीव वर्गासाठी 300 रुपये एवढे प्रवेश शुल्क असणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23/index.php?show=home या लिंक वर माहिती भेटेल. अधिक माहितीसाठी संपर्क शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यलामध्ये भेट द्या, अशी माहिती प्राचार्य डॉ. ए. एम. जिंतूरकर यांनी दिली आहे.