जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Crime News : छ. संभाजीनगरमध्ये महिलांची अंतर्वस्त्र चोरणारा अटकेत, चौकशीत सांगितले धक्कादायक कारण

Crime News : छ. संभाजीनगरमध्ये महिलांची अंतर्वस्त्र चोरणारा अटकेत, चौकशीत सांगितले धक्कादायक कारण

महिलांची अंतर्वस्त्र चोरणारा अटकेत

महिलांची अंतर्वस्त्र चोरणारा अटकेत

Crime News : महिलांची अंतवस्त्रे चोरणाऱ्या एका व्यक्तीला पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 22 जुलै : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे समोर आले आहे. ही गुन्हेगारी माडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनही आता मैदानात उतरली आहे. दरम्यान, शहरात चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आला. एक आरोपी महिलांची वाळत घातलेली अंतरवस्त्रे चोरत होता. या चोरीच्या प्रकाराने महिलाही हैराण झाल्या होत्या.     अखेरीस महिलांनीच याला पडकून चांगला चोप दिला. काय आहे प्रकरण? संभाजीनगर जवळील वाळूज औद्योगिक महानगरमध्ये एका विचित्र चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा तरुण सोसायटीमधील महिलांनी वाळत घातलेली अंतर्वस्त्र चोरायचा. अनेक महिलांची तक्रार होती. शेवटी ऐका सोसायटीतील महिलांनी त्या तरुणाला ओळखून चांगला चोप दिला. त्यानंतर दामिनी पथकाला बोलावून त्यांच्या ताब्यात त्या विकृत तरुणाला दिले. लग्न जमत नसल्याने हा तरुण असले विकृत चाळे करीत होता, अशी प्राथमिक माहिती आहे. वाचा - सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, गरोदर राहिल्याने प्रकरण उघड संभाजीनगर शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांना कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुंडलिक नगर गारखेडा परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीतील सहा गुंडांना जेरबंद केल्यानंतर ते राहत असलेल्या परिसरातून त्यांची धींड काढून त्यांची दहशत कमी करण्याबरोबरच सामान्य नागरिकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न पुंडलिक नगर पोलीस प्रयत्न करीत आहे. बेंगळुरूमध्येही असाच धक्कादायक प्रकार बेंगळुरूमध्ये महिलांची अंतर्वस्त्रे चोरून गच्चीवर हस्तमैथुन करताना एक व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इसम हा भाड्यानं खोली पाहण्याच्या नावाखाली परिसरात येत असे. या काळात तो असले भलते उद्योग करत असे. या इसमानं अनेक महिला अंघोळ करत असताना त्यांचे छुपे व्हिडिओ बनवल्याचाही आरोप आहे. राजगोपालनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात