जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शहरात 24 तासात तिघांनी संपवलं जीवन, 3 घटनांनी छ.संभाजीनगर हादरलं

शहरात 24 तासात तिघांनी संपवलं जीवन, 3 घटनांनी छ.संभाजीनगर हादरलं

शहरात 24 तासात तिघांनी संपवलं जीवन, 3 घटनांनी छ.संभाजीनगर हादरलं

24 तासात तिघांनी आत्महत्या केल्याच्या या घटनांनी शहर हादरलं आहे.

  • -MIN READ Local18 Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छ. संभाजीनगर, 5 एप्रिल : मागील 24 तासांत छ.संभाजीनगर आत्महत्येच्या 3 घटनांनी हादरलं आहे. छ.संभाजीनगर शहरातील सुराणानगर, किराडपुरा आणि अंगुरीबाग परिसरातील तिघांनी कौटुंबिक‎वादातून आत्महत्या केली.

News18लोकमत
News18लोकमत

मी चाललो… गेवराईच्या व्यावसायिकाने साेलापूर-धुळे महामार्गाजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या‎केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी मी चाललो, अशी पोस्ट सोशल‎मीडियावर टाकली आणि त्यानंतर आत्महत्या केली. चेतन रविंद्र जैस्वाल (42), असे या व्यावसायिकाचे नाव आहे. चेतन मूळ गेवराई येथील होते. त्यांचा मद्यविक्रीसह‎हॉटेलचा व्यवसाय आहे. मात्र, दोन मुलांच्या शिक्षणासाठी काही महिन्यांपासून ते पत्नीसह सुराणानगरात राहत‎होते. ते रागाच्या भरात निघून गेले होते. त्याच्या काही तासांनंतर त्यांनी सोशल मीडियावर मी चाललो,‎अशी पोस्ट करत मोबाईल बंद केला. त्यानंतर‎ त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकला नाही. यानंतर 4 एप्रिलला सकाळी सोलापूर-धुळे महामार्गावरील‎ तलवानी शाळेसमोर छोट्या तलावाजवळ लिंबाच्या‎ झाडाला एक व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती एमआयडीसी‎वाळूज पोलिसांना मिळाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंमलदार पंढरीनाथ‎साबळे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. यावेळी चौकशीत जैस्वाल यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न‎ झाले.‎ आणखी दोघांची आत्महत्या - किराडपुऱ्यातील जोहेब खान रऊफ‎खान या 22 वर्षांच्या तरुणानेही रागाच्या भरात 1 एप्रिल रोजी रात्री‎विषारी औषध घेतल होते. यानंतर मंगळवारी घाटीत मृत्यू झाला. याप्रकरणी जिन्सी पोलीस तपास करीत आहेत.‎ तर यासोबतच एका 27 वर्षीय कामगारानेही गळफास‎घेत आत्महत्या केली. अंगुरीबाग येथील अजीम‎नजीर शेख याची पत्नी मागील काही दिवसांपासून माहेरी गेली होती. याने मंगळवारी पहाटे 5 वाजताच्या आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी तो त्याच्या खोलीत लटकलेल्या‎ अवस्थेत आढळला, यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सिटी चौक ठाण्याचे सहायक फौजदार देविदास तुपे तपास करीत आहेत. तर 24 तासात तिघांनी आत्महत्या केल्याच्या या घटनांनी शहर हादरलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात