अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै : छत्रपती संभाजीनगरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पूजेसाठी बेलाचे पाने तोडताना भिंत अंगावर पडून एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना हर्सूल परिसरात घडली. बबन सदाशिव गुरव असे मयत पुजाऱ्याचे नाव आहे. हर्सूल जळगाव रोडवरील गजानन महाराज मंदिरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काय आहे घटना? मंदिरासाठी बेलाची पाने तोडण्यासाठी ते मंदिरात भिंतीलगत असलेल्या झाडावर चढले. त्यांचा एक पाय झाडावर तर दुसरा पाय भिंतीवर होता. यावेळी भिंत पडत असल्याचे समजताच त्यांनी उडी मारली. दुर्दैवाने भिंत बबन यांच्या अंगावर पडली. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान परिसरात आवाज झाल्याने त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाचा - 2 मित्रांची सोबतच ट्रेनसमोर उडी घेत संपवलं आयुष्य; छ. संभाजीनगरमधील हादरवणारी घटना विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू पैठण तालुक्यातील मुरमा येथील 35 वर्षीय विवाहीत महिला विहीरीवर पाणी शेंदण्यासाठी गेलेली असता तिचा तोल जाऊन विहीरत पडल्याने मृत्यू झाला. छाया भरत मापारी, असे मृत महिलेचे नावं आहे. भरत मापारी व त्यांची पत्नी छाया मापारी हे सोमवारी सकाळी घरुन जेवण करून घरगुती कामे आटोपून स्वतः शेतात शेतपिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी छाया विहिरीतून पाणी शेंदत होत्या. परंतु, छाया ह्यांचा तोल जाऊन त्या विहीरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. या अपघातात चिमुकल्यावरुन आईचे छत्र हरपलं असल्याने परिसरातील सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.