जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वाढदिवसाच्या बॅनरला पाय लागला म्हणून केली मारहाण, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

वाढदिवसाच्या बॅनरला पाय लागला म्हणून केली मारहाण, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

बॅनरवर पाय दिला अन् तरुणासोबत घडलं भयंकर

बॅनरवर पाय दिला अन् तरुणासोबत घडलं भयंकर

बॅनरवर पाय चुकून पडला खरा त्याने याबाबत माफी देखील मागितली. मात्र त्याचं काहीही न ऐकता तिथल्या 10 ते 12 तरुणींना बेदम मारहाण केली.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, छत्रपती संभाजी नगर 21 जुलै : छत्रपती संभाजीनगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने आपली आणि कुटुंबाची बदनामी होत असल्याच्या कारणातून आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुणाच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्या मुलासोबत असं काय घडलं की त्याने एवढा टोकाचा निर्णय घेतला. ठाकरे गटाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवस होता. त्यानिमित्ताने बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर राष्ट्रीय महापुरुषांचा फोटो छापलेला होता. या बॅनरवर महेशने पाय ठेवला आणि तीच चूक त्याला या निर्णयापर्यंत घेऊन आली. त्याचा पाय चुकून पडला खरा त्याने याबाबत माफी देखील मागितली. मात्र त्याचं काहीही न ऐकता तिथल्या 10 ते 12 तरुणींना बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्याच्या घरच्यांनाही मारहाण केली आहे. मारहाण झालेल्या तरुणाचं नाव महेश बोबडे असल्याची माहिती मिळाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या ईसारवाडी इथे ही घटना घडली आहे. एवढ्यावर हे प्रकरण मिटलं नाही, त्यांनी महेश आणि कुटुंबातील सदस्यांना माफी मागण्यास भाग पडलं. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकीही दिली. या बॅनरच्या वादातून आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचा अपमान सहन न झाल्यामुळे महेश बोबडे याने शेतात गळफास लावुन आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी औद्योगिक पोलिस ठाणे पैठण इथे 12 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून 08 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात