छत्रपती संभाजीनगर, 13 जुलै : महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. या महिन्याला काही दिवसामध्येच सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मामध्ये या महिन्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये अनेक लोक हे जावयाला आणि गुरुजींना अनेक भेटवस्तू देत असतात. या महिन्यात कोणत्या भेटवस्तू दिल्या जातात आणि याची खरेदी तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे करू शकतात याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाचा आणि गुरुजींचा मान असतो. त्यामुळे याना भेटवस्तू दिल्या जातात. छत्रपती संभाजीनगर मधील औरंगपुऱ्यातील सराफ बाजारामध्ये अनेक चांदीच्या भेटवस्तू आणि दागिने हे उपलब्ध झालेले आहेत. धोंड्याचा महिना जवळ आल्यामुळे बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाढत आहे.
काय देवू शकता भेट? यामध्ये निरंजन, तुळस, वाटी, ताम्हण, बॉम्बे प्लेट, अरुणा प्लेट, समई धोंडे त्याचबरोबर चांदीचे शिक्के ही तुम्ही भेट म्हणून देवू शकतात. यामध्ये लाईटवेटमध्ये 80 ग्राममध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला भेटून जातील.
Chhatrapati Sambhaji Nagar News : फक्त 125 रुपयांत खरेदी करा मोत्यांचे दागिने? हे आहे ठिकाण
धोंड्याच्या महिन्यामध्ये अनेक जण हे भेटवस्तू देत असतात. त्यामुळे चांदी आणि सोन्याला महत्त्व दिले जाते. पण सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि हे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत त्यामुळे आम्ही सर्वांना परवडेल असे लाईटवेटमध्ये चांदीच्या वस्तू तयार करून देत आहोत. तुम्ही एकदा नक्की भेट देऊन या वस्तू बघू शकता आणि खरेदी करू शकता, अशी माहिती सराफ व्यापारी रितेश देवडा यांनी दिली आहे.