जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : मानसिक आघात झालेल्या व्यक्तींना मोठा दिलासा, 'या' स्टार्टअपमधून मिळणार सर्व मदत

Video : मानसिक आघात झालेल्या व्यक्तींना मोठा दिलासा, 'या' स्टार्टअपमधून मिळणार सर्व मदत

Video : मानसिक आघात झालेल्या व्यक्तींना मोठा दिलासा, 'या' स्टार्टअपमधून मिळणार सर्व मदत

Chhatrapati Sambhaji Nagar : मानसिक आघात झालेल्या व्यक्तींना या स्टार्टअपमधून मदत मिळणार आहे.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 06 एप्रिल : समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या मानसिक आघाताच्या घटना घडत असतात. ज्यामध्ये हिंसाचार किंवा एखाद्या व्यक्तीने मर्यादा पलीकडे जाऊन दिलेल्या त्रासामुळे होणारा आघात हा माणसाच्या संपूर्ण आयुष्यावरती दुष्परिणाम करणारा ठरू शकतो. यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील चारुता पुराणिक यांनी जागरूकता सबलीकरण आणि मानसशास्त्रीय समुपदेशन असा सर्व समावेशक विषयाचा समावेश करून बिन मी माणूस उपचार केंद्र अंतर्गत लाईफ अबोव्ह व्हायलेन्स या स्टार्टअपची सुरुवात केली आहे. कशी झाली सुरुवात? गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वेगवेगळ्या हिंसाचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. यामध्ये एकत्रित प्रेमातून प्रियसीला जाळून टाकण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे रिक्षा चालकाने महाविद्यालयाच्या मुलीची छेड काढल्यामुळे मुलीने मारलेली रिक्षातून उडी अशा वेगवेगळ्या घटना घडत आहेत. यामुळे ज्या व्यक्तीवर असा प्रसंग येतो तो संपूर्णपणे खचून गेलेला असतो. त्यामुळे या घटना त्यांच्या भविष्यावरती परिणाम करतात. अशा घटनांमध्ये पीडित व्यक्तीचं समुपदेशन करणे अत्यंत गरजेचं असतं. यासाठी चारुता पुराणिक यांनी मागील काही वर्षात अनेक घटना आकडेवारीचा अभ्यास करून तसेच अनेकांशी संवाद साधून लाईफ अबोव्ह व्हायलेन्स या स्टार्टअपची सुरुवात केली आहे. यातून संबंधित व्यक्तीला समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    स्टार्टअपचे तीन टप्पे पहिला टप्पा हा प्रतिबंधात्मक आहे. यामध्ये हिंसाचार व गैरवर्तन म्हणजेच काय या संकल्पनेवरती जनजागृती हिंसाचार किंवा गैरवर्तन याचा सामना करता येणे. स्वतःची मानसिक स्वास्थ्यता टिकून ठेवणे ढळू न देणे या संदर्भात विविध शाळा महाविद्यालय आणि संस्थांमध्ये सामुदायिक शिक्षण प्रशिक्षण पुरवले जाते. दुसरा टप्पा दुसरा टप्पा हा पुनर्वसन आहे या टप्प्यांमध्ये ज्या व्यक्तीला हिंसाचाऱ्याला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यासाठी वैयक्तिक समुपदेशन केले जाते. त्यांना इतर कुठल्या सेवांची आवश्यकता आहे. या संदर्भात माहिती व मार्गदर्शन पुरवले जाते.

    Dog Bite : कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर परिणाम! तातडीनं करा ‘हे’ उपाय, Video

    तिसरा टप्पा तिसरा टप्पा हा उदात्तीकरणाचा आहे. या टप्प्यात संबंधित व्यक्ती पूर्वी हिंसाचाराला सामोरे गेला होता व अजूनही त्याचा या घटनेमुळे मानसिक त्रास होत आहे. त्याचा त्याच्या आरोग्य, आयुष्य आणि त्यासोबतच नात्यांवर परिणाम होत आहे अशा व्यक्तींसाठी समुपदेशन पुरवले जाते. स्टार्टअप मधून मदत घ्यावी हे स्टार्टअप 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी संवाद साधून विकसित केले आहे. मागील सहा महिन्यात 30 पेक्षा जास्त शाळांनी या स्टार्टअपचे स्वागत केले आहे. या स्टार्टअप अंतर्गत गैरवर्तन किंवा हिंसाचारकरणाऱ्या व्यक्तींनी देखील स्वतःच्या मन स्थितीवर काम करण्यासाठी समुपदेशन लाभ घेतला आहे. एखाद्या व्यक्तीवर असा प्रसंग आला असेल किंवा येत असेल अशा व्यक्तींनी आमच्याशी नी संकोचपणे संपर्क साधावा त्यांच्या माहितीची गोपनीयता ठेवण्याची जबाबदारी या स्टार्टअप मधून केली जाते. यामुळे महिला, पुरुष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी या स्टार्टअप मधून मदत घ्यावी ,असे आवाहन चारुता पुराणिक यांनी केले आहे. पूर्ण पत्ता  हाऊस क्रमांक 40, सह्याद्री हिल्स, शिवाजीनगर, गारखेडा परीसर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क: मेल आयडी beingme.psycentre@gmail.com वेबसाईट : www.lifeaboveviolence.com

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात