जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एका आवाजाने रिक्षा चालकाचा फसला डाव; संभाजीनगरमध्ये 16 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

एका आवाजाने रिक्षा चालकाचा फसला डाव; संभाजीनगरमध्ये 16 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

एका आवाजाने रिक्षा चालकाचा फसला डाव (संग्रहित छायाचित्र)

एका आवाजाने रिक्षा चालकाचा फसला डाव (संग्रहित छायाचित्र)

छत्रपती संभाजीनंगरमध्ये रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचे अपहकरण करण्याचा प्रयत्न केला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 12 एप्रिल : राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. छत्रपती संभाजीनंगरमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. एका रिक्षाचालकाने 16 वर्षीय मुलीला एकटे पाहून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रसंगावधानाने तिची सुटका झाली. या प्रकरणात रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काय आहे प्रकरण? वाळूज येथे एका 16 वर्षीय मुलीला एकटी बघून रिक्षा चालकाने 7 ते 8 किलोमीटर रिक्षा घेऊन गेला. मात्र, मुलीला तिचे वडील दिसल्याने तिने वडीलांना जोराचा आवाज दिला आणि पुढील अनर्थ टळला. मुलीचा आवाज ऐकल्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि नागरिकांनी रिक्षा थांबून रिक्षा चालकाला चोपही दिला. एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एमआयडीसी पोलिसांकडून रिक्षा जप्त करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे रिक्षाचालकांच्या गैर वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाचा - पत्नीच्या मोबाईलमधील चॅटिंग पाहिली, त्याचं डोकंच फिरलं, थेट DNA चाचणी केली आणि.. शहराच्या विविध भागातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण काही दिवसांपूर्वी शहराच्या विविध भागातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पिसादेवी रोडवरील वैशाली ढाब्याजवळील रमाईनगरात राहणारी 17 वर्ष 7 महिन्याची अल्पवयीन तरूणी 24 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजेपासून अचानकरित्या घरातून बेपत्ता झाली. तिने घरातील कपडेही सोबत नेल्याची तक्रारीत वडीलांनी म्हटले आहे. रोशनगेट परिसरातील करीम कॉलनी येथील जनता किराणा दुकानाजवळ राहणारी महाविद्यालयीन तरूणी 25 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपासून घरातून बेपत्ता झाली आहे. तर तिसऱ्या घटनेत एमआयडीसी वाळूज परिसरातील रहिवासी असलेली 16 वर्षीय मुलगी 23 मार्च रोजी सकाळी 7 वाजता पंढरपुर येथील सम्राट अशोक विद्यालयात जाते असे सांगून बेपत्ता झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात