जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Adarsha Scam : आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; 50 जणांवर गुन्हे, ठेवीदाराची आत्महत्या, मुख्य आरोपी म्हणातो..

Adarsha Scam : आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; 50 जणांवर गुन्हे, ठेवीदाराची आत्महत्या, मुख्य आरोपी म्हणातो..

आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा

आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा

Adarsha Scam : छत्रपती संभाजीनगर शहरात एका घोटाळ्याने अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. तब्बल 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका घोटाळ्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आदर्श नागरी पतसंस्थेच्या संचालकांनी वेगवेगळ्या संस्थांच्या नावावर कर्ज लाटून 200 कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतसंस्था चालक अध्यक्ष अंबादास मानकापे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसमोर मात्र आता आपल्या पैशांचं काय प्रश्न निर्माण झाला आहे. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर एका गुंतवणूकदाराने आत्महत्या केल्याचंही समोर आलं आहे. काय आहे प्रकरण? 75 वर्ष वयाचे नामदेव मालकर हे काठी टेकवत रोज पथसंस्थेत चकरा मारतात. मोलमजुरी करून त्यांनी पैसे जमवले घर विकलं आणि 6 लाखाची एफडी छत्रपती संभाजी नगर शहरातील आदर्श पतसंस्थेमध्ये केली. आज पायाला छोटी गाठ आली म्हणून पाय पूर्ण सुजलाय. डॉक्टरांनी हा पाय कापावा लागेल आणि त्यासाठी एक लाखांची गरज आहे, असं सांगितलं. त्यामुळे ते रोज लंगड्यात लंगडत पतसंस्थेकडे येतात पैशांची मागणी करतात पण पतसंस्था आज या, उद्या या, दहा दिवसांनी या महिन्यान या हेच उत्तर देते. आज पतसंस्थेला टाळे लागले आणि आपल्या पैशांच काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. रोज पतसंस्थेसमोर येऊन आपल्या जखमी पायावर चिंध्या बांधत पैसे मिळतील या अपेक्षेने रोज चकरा मारतात. दरम्यान आता घोटाळ्यात पहिला बळी गेला असून, एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. पतसंस्थेत  22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लाडगाव येथे घडली असून, रामेश्वर नारायण इथर असे मृताचे नाव आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या  शिक्षणाची व लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. अधिकच्या व्याजापोटी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हजारो लोकांनी या पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवल्या आणि बँकेच्या अध्यक्ष संचालक मंडळाने बनावट कर्ज काढली आणि पैसा लाटला. त्यामुळे ठेवीदारांच्या पैशांचं काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षात पतसंस्थेचे कर्मचारी, नातेवाईक आणि स्वतःच्याच वेगवेगळ्या संस्थांना विना तारण कर्जाची खिरापत वाटून सर्वसामान्य गरिबांचा पैसा चक्क संचालकांनी लुटला आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात पतसंस्थेचा अध्यक्ष अंबादास मानकापेसह 50 जणांवर गुन्हा दाखल झालाय. वाचा - मुंबईत चोरीचा अजब प्रकार! चोरलेली रिक्षा गहाण ठेऊन पैसे ट्रान्सफर छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्यात आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा मोठा विस्तार आहे. शहरासोबतच तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात आदर्श ग्रुपच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. शेतकरी, कष्टकरी, दुकानदार, व्यापारी आणि नोकरदारांनी या पतसंस्थेमध्ये लाखोच्या ठेवी गुंतवलेल्या आहेत. आकर्षक व्याजदर, दाम दुप्पट योजना, विनातारण कर्ज अशा वेगवेगळ्या योजना राबवून लाखो सभासद या पतसंस्थेची जोडले गेले आहेत. त्या जमा झालेल्या रकमा मात्र संचालक मंडळांनी लुटल्याचं समोर आलंय. ऑडिटरने मला विश्वासात घेतलं नाही, यात माझा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. नेमका घोटाळा काय? संचालक मंडळाने ठरावीक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटली. आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या जवळपास 15 संस्थांना ते वाटप केले तर काही नातेवाईक, ओळखींच्या नावे कर्ज उचलले. यासाठी विनातारण, विनाजामिनदार, बनावट तारण आणि सभासद उभे करण्यात आले. 2016 ते 2019 मध्ये 103 कोटी 16 लाख 73 हजार 381रुपयांचा घोटाळा केला तर 2018 ते 2013 मध्ये 99 कोटी सात लाख 90 हजार 579 रुपयांचा घोटाळा केला. 2019 मध्ये 23 कर्ज प्रकरणात कागदपत्रेदेखील अपूर्ण आहेत, तर 2021 मधील एका कर्जात अपूर्ण अर्जात कर्जवाटप झाले. 2003 मध्ये स्थापन झालेल्या आदर्श नागरी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याची गेल्या 6 महिन्यांपासून चर्चा होती. आता ठेवी लुटल्याचं पोलीस तपासात उघड झाले. आता पोलीस आरोपीच्या सर्व संपत्तीची माहिती गोळा करणार आहेत. त्यानंतर त्या जप्तीच्या परवानगीसाठी सरकारकडे अर्ज करून त्या संपत्तीचा लिलाव केला जाईल. मगच ठेवीदारांना रक्कम परत केली मिळेल असं सध्या तरी सांगितलं जातंय. मात्र काही वर्षांपूर्वी राज्यात गाजलेल्या आदर्श घोटाळ्याची आठवण पुन्हा झालीय. पण या आदर्श घोटाळ्याने सर्वसामान्य ठेवीदारांना कंगाल केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात