जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 100 कोटी वसूली प्रकरणी सचिन वाझेची तळोजा जेलमध्ये जाऊन CBI करणार चौकशी

100 कोटी वसूली प्रकरणी सचिन वाझेची तळोजा जेलमध्ये जाऊन CBI करणार चौकशी

100 कोटी वसूली प्रकरणी सचिन वाझेची तळोजा जेलमध्ये जाऊन CBI करणार चौकशी

Sachin Waze: 100 कोटी वसूली प्रकरणी ( Money Laundering) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची (Dismissed Cop Sachin Waze) पुन्हा चौकशी होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 जुलै: 100 कोटी वसूली प्रकरणी ( Money Laundering) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची (Dismissed Cop Sachin Waze) पुन्हा चौकशी होणार आहे. सीबीआय सचिन वाझेची चौकशी करणार आहे. न्यायालयानं सीबीआयला (CBI) चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. सीबीआय तळोजा जेलमध्ये जाऊन वाझेची चौकशी करेल अशी माहिती समजतेय. सचिन वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे. सचिन वाझेनं न्यायालयाला लिहिलेल्या पत्रावरुन सीबीआय ही चौकशी करेल. या पत्रात वाझेनं 3 मंत्री आणि एका बड्या नेत्यावर आरोप केले होते. सीबीआयनं एप्रिलमध्ये त्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून वाझेची चौकशी केली होती. अनिल देशमुख दिल्लीला रवाना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ed) दुसऱ्यांदा समन्स बजावला. त्यानंतर देशमुख यांनी आता दिल्लीकडे धाव घेतली आहे. दिल्लीतील वकिलांचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी रवाना झाले आहे. तसंच राजकीय नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेही वाचा- यामी गौतमनंतर बॉलिवूडचा आणखी एक अभिनेता EDच्या जाळ्यात अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक झाल्यानंतर ईडीने (Enforcement Directorate) आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी कोरोनाचा काळ आणि वय वाढल्यामुळे चौकशीला हजर राहण्यापासून मुदत मागितली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात