मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी : वाधवान बंधूंना अखेर CBI ने घेतलं ताब्यात, गृहमंत्र्यांनी दिली माहिती

मोठी बातमी : वाधवान बंधूंना अखेर CBI ने घेतलं ताब्यात, गृहमंत्र्यांनी दिली माहिती

सीबीआयच्या लेखी विनंतीवरून वाधवान बंधूंना मुंबईत आणण्यासाठी सातारा पोलीस सहकार्य करत आहेत.

सीबीआयच्या लेखी विनंतीवरून वाधवान बंधूंना मुंबईत आणण्यासाठी सातारा पोलीस सहकार्य करत आहेत.

सीबीआयच्या लेखी विनंतीवरून वाधवान बंधूंना मुंबईत आणण्यासाठी सातारा पोलीस सहकार्य करत आहेत.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 26 एप्रिल : वाधवान बंधूंना सीबीआयने घेतलं ताब्यात आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान या दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं असून अटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीबीआयच्या लेखी विनंतीवरून वाधवान बंधूंना मुंबईत आणण्यासाठी सातारा पोलीस सहकार्य करत आहेत. कपील आणि धीरज वाधवान हे हाऊसिंग फायनान्स लि.चे (DHFL)प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्याचे आरोपी आहेत. राज्यात संचार बंदी सुरू असतानाच येस बॅक प्रकरणात जामीनावर असणारे वाधवान बंधू कुटुंबीयांसमवेत 23 लोकांना VIP पास दिला गेला. मुंबईतून खंडाळा, महाबळेश्वर प्रवास यासाठी कार पास पत्र गृह विभाग सचिव विशेष अमिताभ गुप्ता यांनी दिला असा आरोप आहे. दरम्यान, वाधवान बंधूंना अंमलबजावणी संचनासय (ईडी) आणि सीबीआयने ताब्यात घ्यावे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधीच म्हटले होते. 'वाधवान बंधूंचा 14 दिवसांचा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा कालावधी बुधवारी दुपारी 2 वाजता समाप्त झाला. त्यांना ताब्यात घेतण्यात यावे, असं सीबीआय आणि ईडीला सांगितलं आहे. वाधवान बंधूंना सीबीआय किंवा ईडी ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते राज्य सरकारच्या ताब्यात राहतील. कोणालाही लंडनला जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. सीबीआयने वाधवान बंधूंचा ताबा मागितल्यास त्यांच्या हवाले करण्यात येईल,' असं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. खंडाळ्याहून गेले महाबळेश्वरला... कपील आणि धीरज वाधवान बंधू यांनी लॉकडाऊनची उल्लंघन केल्याचं उघड झालं आहे. 144 कलमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. हे वाधवान बंधू आपल्या 5 अलिशान कारमधून 23 कुटुंबीयांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही गेले होते. या प्रवासासाठी त्यांनी थेट गृहमंत्रालयातून पत्र मिळालं होतं. या पत्राने वाद निर्माण झाला असून ही परवानगी कुणी दिली याची चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. गृहमंत्रालयाचे प्रधान सचिव अमिताभ गृप्ता यांच्या लेटरहेडवर वाहतुकीच्या परवानगीचं पत्र आहे. 8 एप्रिल अशी त्यावर तारीखही आहे. ही मंडळी माझ्या ओळखीची असून कौटुंबिक मित्र आहेत. तातडीच्या कौटुंबिक कामासाठी त्यांना खंड्याहून महाबळेश्वरला जात आहेत. त्यांना तिथे पोहोचता यावं यासाठी सहकार्य करावं असं त्या पत्रात म्हटलं आहे. या पत्रावरून सोमय्या यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Anil deshmukh, Yes bank

पुढील बातम्या