राहुल पाटील, पालघर प्रतिनिधी पालघर, 29 ऑक्टोबर : केमिकल कंपनीत स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत पुन्हा एकदा ब्लास्ट झाला आहे. यावेळी कंपनी बंद असल्याने ही घटना कशी घडली याबद्दल तपास करण्यात आला. या तपासासून धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे घटना? बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात औरा ऑइल या बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सिलेंडरचा ब्लास्ट होऊन भीषण आग लागली. बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीतील साहित्याची चोरी करत असताना हा ब्लास्ट झाला असल्याची माहिती समोर आली असून या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या जखमीवर बोईसर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर कंपनीला भीषण अशी आग लागली असून धुराच्या उडणाऱ्या लांबच लांब लोळाणे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आला आहे.
पालघर - बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत स्फोट pic.twitter.com/J9vwYwU1Op
— News18Lokmat (@News18lokmat) October 29, 2022
या स्फोटानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली ती म्हणजे ही कंपनी मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असून या कंपनीतील साहित्याची गॅस कटरच्या साहित्याने चोरी सुरू होती. अशाच पद्धतीने काही साहित्य गॅस कटरच्या सहाय्याने कट करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. त्यामुळे बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बाहेरून बंद असणाऱ्या कंपन्यांमध्ये राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झाला आहे. या सगळ्यामुळे एमआयडीसी आणि यावर नियंत्रण असणाऱ्या फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या कार्यक्षमतेवर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय.