Home /News /maharashtra /

'...तर महाराष्ट्राचे तुकडे होतील', आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा

'...तर महाराष्ट्राचे तुकडे होतील', आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा

उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

सातारा, 1 डिसेंबर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उदयनराजे भोसले आणि शशिकांत पवार यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. 'मराठा समाजाला वंचित ठेवता कामा नये. महाराष्ट्र एकत्र ठेवायचा असेल तर सर्व जातींना एकत्र केलं पाहिजे. मेहरबानी करून मराठा मुद्द्याला फाटे फोडू नका, नाहीतर महाराष्ट्राचे तुकडे नक्की होतील. स्वार्थी लोकांना समाजाने बाजूला केलं पाहिजे. हा राज्याचा प्रश्न आहे, राज्याने सोडवला पाहिजे,' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आलेली आहे. मंडल आयोगाच्या वेळी काय घडलं हे प्रत्येकाला माहीत नाही. मुद्दा मी उपस्थित केला असता तर माझ्यावर भडिमार केला असता. मी आणि संभाजी राजे बघतील असे बोलून बंदूक आमच्या खांद्यावर दिली. मराठा आरक्षण दिरंगाईला सर्व आमदार आणि खासदार जबाबदार आहेत, असंही उदयनराजे म्हणाले. शशिकांत पवारही सरकारवर बरसले, जाणून घ्या ठळक मुद्दे : - मंडल आयोगाला त्या वेळी विरोध मी केला - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार साहेब बोलत नाहीत - सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे - शरद पवार आणि सर्व नेत्यांना एकत्र बोलावण्याचा मी प्रयत्न करेन - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला पाडण्याचे काम केले - मंडल आयोगाला पवार साहेबांनी पाठिंबा दिला - आरक्षण त्यावेळी शरद पवारांच्या हातात होत मात्र त्यांनी केलं नाही - महाविकास आघाडीत सगळे एकत्र झालेत तर काही लोक त्यांच्या पासून दूर गेलेत - मंडल आयोगात मराठा समाजाचा समावेश होण्यासाठी शरद पवारांचा रस राहिलेला नाही - मंडल आयोगामुळे सर्व जाती तुटल्या गेल्या - आरक्षणाचा विषय कोर्टात विषय गेलेला आहे, त्यामुळे सर्वांना एकत्र करावेच लागेल
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Maratha reservation

पुढील बातम्या