उस्मानाबाद, 10 ऑगस्ट : भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाल्यानं खळबळ उडाली आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस आणि आमदार सुजितसिंह ठाकुर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुजितसिंह यांच्यासह कुटुंबातील 6 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली आहे.
'3 ऑस्टपासून बाहेर मी कोणाचाही संपर्कात आलो नाही. मंगळवारी 4 ऑगस्टला कुटुंबातील सर्वांची रॅपीडड अॅन्टीजन टेस्ट झाली. कुटुंबातील 6 सदस्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्यांची चाणी केली आहे मात्र त्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. माझ्यासह सर्वांची पकृती चांगली आहे. लक्षणे नाहीत. काळजी घेतो आहे. आपणही आपली व परिवाराची काळजी घ्यावी' असं नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करत सुजितसिंह यांनी आपल्या फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केलं आहे. सध्या त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात काय आहे कोरोनाची स्थिती?
रविवारी तब्बल 13,348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ही 3 लाख 51 हजार 710 एवढी झाली आहे. तर नव्या रुग्णांची संख्याही वाढली असून दिवसभरात 12,248 नवीन कोरोना रुग्ण नोंद झाली. रविवारी राज्यात 390 रुग्णांचा मृत्यू. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.