मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सत्तासंघर्ष सुरू असताना भाजपचा 'प्लान बी', पक्षाचं लक्ष आता स्थानिक निवडणुकांवर

सत्तासंघर्ष सुरू असताना भाजपचा 'प्लान बी', पक्षाचं लक्ष आता स्थानिक निवडणुकांवर

काही दिवसांवर महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. पण यात आपला पक्ष खंबीरपणे उभा रहावा म्हणून भाजपने जाळं विणायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांवर महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. पण यात आपला पक्ष खंबीरपणे उभा रहावा म्हणून भाजपने जाळं विणायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांवर महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. पण यात आपला पक्ष खंबीरपणे उभा रहावा म्हणून भाजपने जाळं विणायला सुरुवात केली आहे.

मुंबई, 16 नोव्हेंबर : एकीकडे राज्यात शिवसेना आणि महाआघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नात आहे तर दुसरीकडे भाजपदेखील सत्ता स्थापन करण्यासाठी सकारात्मक आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना आणि भाजपचा संसार तुटला. त्यानंतर आता शिवसेना आघाडीसोबत संसार थाटण्याच्या तयारीत आहे. असं असताना आता काही दिवसांवर महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. पण यात आपला पक्ष खंबीरपणे उभा रहावा म्हणून भाजपने जाळं विणायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमिवर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी 59 जागी पराभूत झालेल्या उमेदवारांशी चर्चा केली आहे.

59 जागी आम्ही विजयी झालो नाही. मात्र, 55 जागी आम्ही क्रमांक दोनवर होतो. पण काही दिवसांवर येणाऱ्या महापौर निवडणुकांसाठी सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आज चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी पराभूत झालेल्या 59 उमेदवारांशी चर्चा केली. सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांना सकारात्मकदृष्ट्या सामोरे जातील असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. त्यामुळे भाजपला सोबत घेतल्याशिवाय कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकणार नाही असा विश्वास शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवला. त्यात पुन्हा आपलं सरकार येईल. या सरकारद्वारा सगळ्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असं मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला केलं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे आता भाजपचा सत्ता स्थापनेसाठी काय प्लान आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे.

आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही, चंद्रकांत पाटलांचा दावा

शुक्रवारी भाजपची राज्यपातळीवर चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असा दावा केला. भाजपला एकूण संख्याबळ 105 आहे. त्यात 14 अपक्ष सहयोगी त्यामुळे एकूण असे 119 आमदार भाजपकडे आहेत. त्यामुळे भाजपला सोबत घेतल्याशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

भाजपच्या कालपासून 3 बैठका पार पडल्या. यामध्ये आमदार, अपक्ष आणि विधानपरिषद अशा विषयांवर चर्चा झाली. यावेळी भाजपचं सरकार येणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे. भाजपला विधानसभेत सगळ्यात जास्त म्हणजे 1 कोटी 42 लाख मतं मिळाली, दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला 90 लाख मतं मिळाली. त्यामुळे भाजपच एक नंबरचा पक्ष असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

यावेळी भाजपने 164 जागा लढल्यानंतर 105 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये महिला आमदारांची संख्या जास्त असल्याचंही पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, ज्या ठिकाणी भाजपने जागा हरल्या त्या 59 जागांपैकी 55 जागांवर भाजप नंबर 2 वर आहे. 26 आयारामांपैकी 16 विजयी झाले. त्यामुळे या सगळ्याच भाजप हाच महाराष्ट्रातला मोठा पक्ष आहे. इतर कोणत्याही पक्षाला 100 हून अधिक आमदार जिंकता आले नाही असं चंद्रकांत पाटीलांनी म्हटलं होतं.

First published:

Tags: Maharashtra Assembly Election 2019