मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजपने विधानपरिषदेचा चौथा उमेदवार बदलला, अजित गोपचडे यांना हटवून 'या' नेत्याला दिली संधी

भाजपने विधानपरिषदेचा चौथा उमेदवार बदलला, अजित गोपचडे यांना हटवून 'या' नेत्याला दिली संधी

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis along with other BJP legislators arrives to attend a meeting on the Maratha reservation issue,  at the party office in Mumbai on Thursday, August 2, 2018. (PTI Photo/Shashank Parade) (PTI8_2_2018_000146B)

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis along with other BJP legislators arrives to attend a meeting on the Maratha reservation issue, at the party office in Mumbai on Thursday, August 2, 2018. (PTI Photo/Shashank Parade) (PTI8_2_2018_000146B)

भाजपने ऐनवेळी विधानपरिषद निवडणुकीसाठी दिलेला चौथा उमेदवार बदलला आहे.

मुंबई, 12 मे : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, हे निश्चित झालं असलं तरीही या निवडणुकीतील उत्सुकता अजुनही संपलेली नाही. कारण भाजपने ऐनवेळी विधानपरिषद निवडणुकीसाठी दिलेला चौथा उमेदवार बदलला आहे. भाजपकडून आता अजित गोपचडे यांच्याजागी रमेश कराड हे निवडणूक उमेदवार असणार आहेत.

रमेश कराड यांनी काल (सोमवारी) विधानपरिषद निवडणुकीसाठी डमी उमेदवार म्हणून भाजपकडून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता भाजपने अजित गोपचडे यांना हटवून रमेश कराड यांची उमेदवारी कायम केली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर रमेश कराड यांनी याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली होती.

'महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा. प्रवीणजी दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपाचे युवा नेते मा. अरविंद पाटील निलंगेकर आणि प्रदीप पाटील खंडापूरकर हे उपस्थित होते,' अशी फेसबुक पोस्ट कराड यांनी लिहिली होती.

विधानपरिषदेला डावलल्यानंतर खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

'विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी मला काँग्रेसकडून ऑफर होती. मी काँग्रेसची उमेदवारी घेतली असती तर भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी मला क्रॉस वोट केलं असतं. या आमदारांनी तसं माझ्याकडे मान्यही केलं होतं,' असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भाजपने विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलत नवीन उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आलं त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी तर ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भाजपकडून कोणते 4 उमेदवार मैदानात?

विधानपरिषद उमेदवारीसाठी भाजपने डॉक्टर रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे

संपादन - अक्षय शितोळे

First published:

Tags: BJP