जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / प्रल्हाद केशव अत्रे: दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही

प्रल्हाद केशव अत्रे: दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही

प्रल्हाद केशव अत्रे: दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही

मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, हिंदी आणि मराठी सिनेमांचं निर्माते, राजकारणी आणि फर्डे वक्ते असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    13 ऑगस्ट: महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रल्हाद केशव अत्र्यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे झाला होता. मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, हिंदी आणि मराठी सिनेमांचं निर्माते, राजकारणी आणि फर्डे वक्ते असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी पुकारण्यात लढ्यातले ते अग्रणी नेते होते. अत्र्यांच्या घणाघाती भाषणांच्या जोरावरच संयुक्त महाराष्ट्र मिळवणं शक्य झालं. ‘नवयुग’ या साप्ताहिकाचं आणि ‘मराठा’ या दैनिकाचं त्यांनी संपादन केलं. सुवर्णकमळ मिळवणारा पहिला मराठी सिनेमा ठरलेल्या ‘श्यामची आई’ या सिनेमाची निर्मितीही अत्र्यांचीच होती. दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही आणि होणारही नाही अशी अत्र्यांची शाब्दीक कोटी विषेश प्रसिद्ध होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: poet
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात