अमित राय/ मुंबई, 26 सप्टेंबर : PFI बाबत मोठी बातमी समोर आली आहे. PFI च्या रडारवर RSS आणि BJP चे अनेक मोठे नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र ATS सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे PFI च्या निशाण्यावर नागपुरचा संघ मुख्यालयदेखील आहे.
PFI च्या मोठ्या प्लानचा खुलासा..
PFI देशातील मोठे RSS आणि BJP नेत्यांवर हल्ला करण्याचा प्लान आखत होतो, अशीही माहिती सांगितली जात आहे. PFI च्या सदस्यांनी RSS ची दसऱ्याच्या दिवशी होणारी पथ संचालनाची माहिती जमा केली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय एजन्सी NIA , CRPF आणि राज्य ATS ने संपूर्ण देशात 10 राज्यांमध्ये PFI शी संबंधित लोकांवर छापेमारी करीत शेकडो लोकांना अटक केलं होतं.
बातमी अपडेट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.