जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आताची मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेला मालवणात मोठा धक्का, भाजपचे 6 ही उमेदवार विजयी

आताची मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेला मालवणात मोठा धक्का, भाजपचे 6 ही उमेदवार विजयी

‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक,’ असे गं मतीचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले.

‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक,’ असे गं मतीचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले.

मालवण खरेदी विक्री संघाची ही मोठी अपडेट आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सिंधुदुर्ग, 13 नोव्हेंबर : मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संस्था मतदारसंघातून भाजपचे 6 पैकी 6 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना मालवणात मोठा धक्का बसला आहे. पहिल्या 6 ही जागा भाजप पुरस्कृत पॅनलने जिंकल्या आहेत. भाजपचे अशोक सावंत यांनी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का दिला आहे. मालवण खरेदी विक्री संघाची ही मोठी अपडेट आहे. आघाडी व युतीच्या पॅनलमध्ये खरी लढत होती. तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार नशीब आजमावत होते. आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील आणी बालेकिल्ल्यात ही महत्त्वपूर्ण निवडणूक होती. शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यावर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील ही पहिलीच निवडणूक आहे. यामुळे वैभव नाईक यांचे कसब लागणार असल्याचे म्हटलं जात होतं. शेवटी वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक अपडेट संस्था मतदार संघात भाजपा पुरस्कृत पॅनलची बाजी ; सहाही जागावर विजय ; महाविकास आघाडीला भोपळा भारतीय जनता पार्टीचे ६ उमेदवार विजयी 1)महेश बाळकृष्ण मांजरेकर 20 मते 2) कृष्णा पांडुरंग चव्हाण 20 मते 3) प्रफुल्ल वासुदेव प्रभू 19 मते 4) राजेश नारायण प्रभूदेसाई 19 मते 5) अभय प्रभुदेसाई - 19 मते 6) राजन जगन्नाथ गावकर 18 मते -वैयक्तिक मधून भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर. -ओबीसी मधून भाजपचे कृष्णा ढोलम आघाडीवर बातमी अपडेट होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: malvan , vaibhav
  • First Published :
जाहिरात
जाहिरात