बेळगाव : एका बिबटयाने पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांची चांगलीच धांदल उडवली. या बिबट्याने प्रशासनाला जेरीस आणलं. त्याला जेरबंद करण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आलं होतं. या पोलीस पथकालाही बिबट्या चकवा देत होता. सकाळपासून बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार सुरू होता. बेळगावच्या गोल्फ परिसरात बिबट्या आढळुन आला आणि धांदल उडाली. बिबट्याला पकडण्यासाठी टीम तैनात करण्यात आली. पोलीस बंदोबस्तही वाढवला. त्यामुळे या परिसरातील 22 शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली. बिबट्याला पकडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे रूप आलं.गेल्या तीन दिवसांपासून बिबट्या या परिसरात ठाण मांडून बसला आहे.वनविभाग आणि पोलीस प्रशासन त्याला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. अशीही मर्कटलीला ; माकडाने असं काही केलं की पोलीस आले धावत-पळत बेळगावात एका बिबट्याने पोलीस आणि विन अधिकाऱ्यांना जेरीस आणलं… तीन दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे… पाहा LIVE व्हिडीओ pic.twitter.com/Ywv0UHAXgV — News18Lokmat (@News18lokmat) August 22, 2022 गेले तीन दिवस या बिबट्याने वन विभाग आणि प्रशासनाला जेरीस आणलं आहे. या बिबट्याला पकडण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. संपूर्ण पोलीस आणि वन अधिकाऱ्यांची फौज बिबट्यामागे लागली आहे. मात्र तो चकवा देत असल्याचं दिसत आहे. बिबट्याला पकडतानाचे लाईव्ह व्हिडीओ समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.