जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhusawal News : एकुलता एक मुलगा शाळेच्या पहिल्याच दिवशी भोवळ आली अन्.. भुसावळमधील घटनेने हळहळ व्यक्त

Bhusawal News : एकुलता एक मुलगा शाळेच्या पहिल्याच दिवशी भोवळ आली अन्.. भुसावळमधील घटनेने हळहळ व्यक्त

भुसावळमधील घटनेने हळहळ व्यक्त

भुसावळमधील घटनेने हळहळ व्यक्त

Bhusawal News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा धक्कादायक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 13 जून : भुसावळ शहरातील सीबीएससी माध्यमांच्या शाळा उघडल्या आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी भुसावळ येथील डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचा भोवळ येऊन कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुयोग भूषण बडगुजर (वय 13) असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. सुयोग हा गेल्या दोन वर्षांपासून हायपर टेन्शन व उच्च रक्तदाबाने त्रस्त होता. त्याला पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जाणार होते. त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. अत्यंत हुशार अशा सुयोगच्या निधनाने शाळेसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू सुयोग सोमवारी पहिल्याच दिवशी उत्साहाने शाळेत आला. आवारात असताना मळमळ होत असल्याचे त्याने सांगितले. यादरम्यान भोवळ येऊन तो जमिनीवर कोसळला. शाळेतील शिपाई व कर्मचाऱ्यांनी त्याला उठवण्याचे प्रयत्न केले. मात्र, बेशुद्ध असल्याने त्याच्या पालकांना माहिती देण्यात आली. चारचाकी वाहनाने सुयोगला शहरातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. पण, तेथे व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती. यामुळे तेथून त्यास डॉ. मानवतकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. राजेश मानवतकर यांनी सुयोगची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आयसीयूमध्ये दाखल केले. व्हेंटीलेटर लावून उपचारसुरू होत नाही. तोच सुयोगची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी इलेक्ट्रिक सीपीआर देऊनही उपयोग झाला नाही. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. नऊ महिन्यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयात मुक्ताईनगर येथे  सेवेत असताना याच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले होते. हा आघात ताजा असताना मुलाच्या मृत्यूला कुटुंबाला सामोरे जावे लागले. वाचा - Mumbai Pune Express Expressway Accident : टँकर उलटला आणि आगीचा भडका उडला, जीव वाचवण्यासाठी उड्या टाकल्या पण… एकुलता एक मुलगा सुयोग हा वर्गातील हुशार विद्यार्थी होता. स्वभावाने शांत असल्याने तो शिक्षक प्रिय होता. बडगुजर कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकस्मात मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुयोगच्या पश्चात आई, लहान बहीण, दोन आत्या, मामा असा परिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात