मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Bhandara Suicide Case : लग्न होत नसल्याने 26 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhandara Suicide Case : लग्न होत नसल्याने 26 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

मागील दोन-तीन वर्षांपासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत असताना देखील लग्न जुळत नसल्याने मानसिक तणावात असलेल्या एका 26 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नेहाल भुरे, भंडारा, 05 ऑक्टोंबर : मागील दोन-तीन वर्षांपासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत असताना देखील लग्न जुळत नसल्याने मानसिक तणावात असलेल्या एका 26 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील अंतरगाव येथे घडली. निलेश रामदास सोनटक्के (26) रा अंतरगाव असे घटनेतील मृत युवकाचे नाव आहे.

मृतक युवक निलेश मागील 2 - 3 वर्षापासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत होता.लग्न जुळत नसल्याने निलेश मागील काही दिवसांपासून तणावात होता. घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास निलेशने घराच्या मागील बाजूस असलेल्या जांभाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

हे ही वाचा : अजमेरचा बाबा पावत असल्याचे सांगून दाम्पत्याने लाखो रुपये लुटले

घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ निलेशला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून निलेशला मृत घोषित केले. या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.

भंडाऱ्यात गुन्ह्यांच्या घटनेत वाढ

प्रेमविवाहानंतर सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या गर्भधारणेवर संशय व्यक्त करीत छळ करून जबरदस्तीने गर्भपात केल्याची घटना घडली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथे उघडकीस आली.

या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून दिघोरी मोठी पोलिसांनी पती निखिल विलास रंगारी (27), सासरा विलास शंकर रंगारी (55), सासू देवला विलास रंगारी (48) हिच्यासह लीना रंगारी (34), अक्षय खोब्रागडे (22), मोहित शेंडे (25), लक्ष्मण जांगळे (38), अंकित रंगारी (32) व साकोली येथील एक महिला व पुरुषाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : Worli Sea Link Accident : मुंबईत सी लिंकवर भीषण अपघात, भरधाव कार रुग्णवाहिकेसह गाड्यांवर आदळली, 5 ठार

काही महिन्यांपूर्वी चिचाळ येथील निखिल रंगारी याने प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर पीडित विवाहिता गर्भवती राहिली. निखिलसह सासू, सासरे यांना भडकवत पीडितेची गर्भधारणा अन्य संबंधातून असल्याचा आरोप करीत पीडितेच्या विरोधात त्यांना भडकाविले.

First published:

Tags: Bhandara Gondiya, Person suicide, Suicide, Suicide news