Home /News /maharashtra /

खेळताना चिमुकल्याच्या हातात आला चक्क नाग, पुढे काय घडलं? पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

खेळताना चिमुकल्याच्या हातात आला चक्क नाग, पुढे काय घडलं? पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

नाग फणा काढून थांबतो आणि हा व्हिडिओ बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो.

बेळगाव, 11 जून : दीड वर्षांचा दुडुदुडु बागडणारा वेदांत... त्याचा व्हिडिओ करणारा काका ...आणि व्हिडिओचे चित्रण सुरू असतानाच वेदांत एका काठीला हात लावायला जातो, पण ती काठी नसते तर तो असतो नाग आणि तोच नाग फणा काढून थांबतो आणि हा व्हिडिओ बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. कर्नाटकमधील बेळगाव जवळच्या कंग्राळी या गावात ही घटना घडली आहे. सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे वेदांत आपल्या काकांसोबत शेतात गेला होता आणि शेतातल्या काळ्याभोर मातीत बागडणाऱ्या वेदांचा व्हिडिओ त्याचा काका तयार करत होता. पण अचानक वेदांतला एक काठी प्रमाणे गोष्ट दिसली म्हणून वेदांत त्या वस्तूकडे झुकला खरा, पण त्याच वेळी त्याचा काका सावध झाला आणि त्यांनतर तात्काळ वेदांतला बाजूला केलं. ती वस्तू म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नव्हतं तर तो होता नाग साप आणि वेदांतने हात लावला तो खरंतर सापाच्या शेपटीला आणि त्याच वेळी नागाने फणा देखील काढला होता. पण सुदैवाची गोष्ट म्हणजे तो नाग साप वेदांतकडे न येता बाजूला वळत पुढे सरपटून निघून गेला. वेदांतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण लहान मुलांकडे आपण किती लक्ष दिले पाहिजे, हेच या व्हिडिओ मधून दिसून येतं. त्यामुळे सुट्टीच्या दिवसांमध्ये तुम्हीही लहान मुलांना कुठे घेऊन गेलात तरी त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, असं आवाहन करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या