रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 24 मे: सध्याच्या काळात अनेक तरुण मेहनतीनं अभ्यास करून कायमस्वरुपी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतात. नुकताच महाराष्ट्रातील पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये बीडमधील नेकनूरचे सहा तरुण पोलीस कॉन्स्टेबल झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये गवंडी कामगार असणारा शैलेश मोरे याचाही समावेश आहे. शैलेश सफाई कामगाराचा मुलगा शैलेश मोरे हा सफाई कामगाराचा मुलगा आहे. घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. काम केल्याशिवाय खायला नाही अशा स्थितीत अर्धवट बांधकाम केलेल्या घरात आई, भाऊ व शैलेश राहतात. आई राहीबाई मोरे या नेकनूर ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. शैलेशच्या शिक्षणसाठी भावानं शिक्षण सोडलं. शैलेशही मजुरीची काम करत शिक्षण करत होता. गावातीलच माध्यमिक विद्यालयात त्यानं शिक्षण घेतलं. बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
पाच वर्षांच्या कष्टाला यश शैलेशला घरच्या जबाबदारीमुळं उच्च शिक्षण घेणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यानं पोलीस भरतीचा निर्णय घेतला. गेल्या 5 वर्षांपासून तो पोलीस भरतीचा सराव करत होता. या काळात घरच्या परिस्थितीमुळं तो गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम करत होता. दिवस-रात्र मेहनत करतानाच त्यानं पोलीस भरतीची जिद्द सोडली नाही. याच जिद्दीला यश मिळालं आणि मुंबई पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली. गंवड्याच्या हाताखाली काम करताना आला फोन पोलीस भरती 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला. तेव्हा शैलेश हा गवंड्याच्या हाताखाली काम करत होता. त्याला निकालाबाबत माहिती नव्हती. मित्रांनी फोन करून त्याला यश मिळाल्याचं सांगितलं. तेव्हा शैलेशनं मोबाईलमध्ये निकालाची खात्री केली. आईला पहिला पेढा चारला. या यशामुळं संपूर्ण मोरे कुटुंबीय आनंदात आहे. UPSC Success Story : भाजी विकून वडिलांनी शिकवलं, आज लेकाने UPSC पास करून दाखवलं रात्रंदिवस केला अभ्यास 2014 पासून तसा मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. मात्र त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मला अनेकदा मोलमजुरी देखील करावी लागली. मात्र 2018 पासून मी स्पर्धा परीक्षेचा दिवस रात्र अभ्यास केला. अनेकदा अपयश देखील आले. मात्र यावेळी मी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो असून आता मुंबई पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदी निवड झाली आहे, असे शैलेश मोरे यानं सांगितलं.