मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /परळी ते पॅरीस! ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या श्रद्धा गायकवाडची Untold Story, पाहा Video

परळी ते पॅरीस! ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या श्रद्धा गायकवाडची Untold Story, पाहा Video

X
सुरुवातीला

सुरुवातीला स्केटिंगसाठी शूज देखील नसलेल्या श्रद्धाने राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले.

सुरुवातीला स्केटिंगसाठी शूज देखील नसलेल्या श्रद्धाने राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    बीड, 15 नोव्हेंबर : स्केट बोर्डिंग करताना आपण आतापर्यंत अनेकांना पाहिलं असेल. स्केट बोर्डिंग शिकणं वाटत तेवढे सोपं काम नाही. यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. ट्रेनिंग घेतल्यानंतरही अनेकांना परफेक्ट स्केट बोर्डिंग करणं जमत नाही. मात्र, मोठ्या मेहनतीने बीडमधील परळीच्या श्रद्धा गायकवाडने स्केटिंग शिकलं आहे. सुरुवातीला स्केटिंगसाठी शूज देखील नसलेल्या श्रद्धाने राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं असून पॅरिसमध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकसाठी देखील तिची निवड झाली आहे.

    अहमदाबादमध्ये झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या श्रद्धा गायकवाडनं सुवर्णपदक पटकावलं आहे. यंदाच्या क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच स्केट बोर्ड या खेळाचा समावेश करण्यात आला होता. त्या खेळातील महिलांच्या गटात श्रद्धानं ही कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर पॅरिसमध्ये 2024 साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये श्रद्धा पात्र ठरली आहे.

    परळी ते पॅरीस हा तिचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. श्रद्धाच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. श्रद्धाचे वडील रविंद्र गायकवाड हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. अशामध्ये श्रद्धाने मिळवलेलं यश गायकवाड कुटुंबीयांसह बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

    भीतीवर मात करत पटकावले गोल्ड! नगरचा अथर्व बनला किक बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन, Video

    घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं आम्ही पुण्यामध्ये स्थायिक झालो. माझे वडील  एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सिक्युरिटीचे काम करतात. त्या ठिकाणी मी माझ्या वडिलांना दुपारचा डबा घेऊन जायचे. दरम्यान त्या ठिकाणी ट्रायल स्केट बोर्ड होते. ते पाहूनच श्रद्धाला देखील या खेळाची आवड निर्माण झाली. आवडीतून प्रॅक्टीस सुरू केली आणि श्रद्धा खेळाडू बनली.

    श्रद्धाने अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला असून बक्षीसही मिळवले आहेत. पुण्यामध्ये झालेल्या स्टेट बोर्ड स्पर्धेमध्ये तिने पहिला क्रमांक देखील पटकावला. 2018 मध्ये बेंगलोर येथील जुगाड स्केट बोर्ड स्पर्धेमध्ये तिने यश संपादन केले. 2022 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या चाचणीत पहिला क्रमांक मिळवला. आता श्रद्धा 2024 मध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

    First published:

    Tags: Beed, Local18, Olympic