जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: लाल मिरचीचा ठसका, महागाईने सर्वसामान्य होरपळले, Video

Beed News: लाल मिरचीचा ठसका, महागाईने सर्वसामान्य होरपळले, Video

Beed News: लाल मिरचीचा ठसका, महागाईने सर्वसामान्य होरपळले, Video

बीडमध्ये लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 7 मार्च: कोणताही तिखट पदार्थ बनवताना लाल मिरचीची गरज भासतेच. लाल मिरची प्रत्येक स्वयंपाकगृहातील अविभाज्य घटक आहे. उन्हाळा सुरू झाला की वर्षभरातील साठवणीचे पदार्थ करण्याची लगबग सुरू होते. यातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लाल तिखट होय. आता बीड जिल्ह्यात मिरचीच्या दरातही मोठी वाढ झाल्यामुळे गृहिणींचे बजेट आणखी कोलमडणार आहे. तर गॅस पासून सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. वातावरणातील बदलांचा फटका गेल्या चार महिन्यांपासून वातावरणातील बदलांचा अनेक पिकांवर परिणाम झाला आहे. काही पिकांची नासधूसही झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका मिरचीला बसल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याच्या बाजारपेठेत येणारी लाल मिरचीची आवक घटली आहे. त्यामुळे मिरचीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात लाल मिरचीच्या दरात क्विंटल मागे तीन ते साडेतीन हजारांची वाढ झाली आहे. तर किलोमागे 20 ते 40 रुपये वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    आंध्र, तेलंगणातील मिरची बाजारात नाही आंध्र प्रदेश, तेलंगणा भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात. दरवर्षी या भागातील मिरची बीडमधील बाजारपेठेत येत असते. येथील शेतकरी ट्रकमधून मिरची आणून त्याची विक्री करतात. मात्र यंदा या राज्यांमध्येच मिरचीची लागवड कमी प्रमाणात झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच बीडच्या बाजारपेठेत लाल मिरचीची आवक थंडावली आहे. Mumbai Wholesale Market : मुंबईतील ‘या’ मार्केटमध्ये करा जगभरातील स्वस्त मसाल्यांची खरेदी! Photos गुंटूर मिरचीची प्रतिक्षा सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन हे गुंटूर या ठिकाणी होत असते. या ठिकाणची मिरचीही बीडच्या बाजारपेठेत दाखल होत असते. मात्र या ठिकाणी देखील वातावरणाच्या बदलामुळे मिरची उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळेही बीड जिल्ह्यामध्ये आवक मंदावली आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दरवाढ होण्यावर झाला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात