जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दरवाजा उघडा ठेऊन अंगणात झोपणे पडले महागात, बीडमध्ये घडली धक्कादायक घटना

दरवाजा उघडा ठेऊन अंगणात झोपणे पडले महागात, बीडमध्ये घडली धक्कादायक घटना

दरवाजा उघडा ठेऊन अंगणात झोपणे पडले महागात, बीडमध्ये घडली धक्कादायक घटना

दरवाजा उघडा ठेऊन अंगणात झोपणे बीडच्या खरकटवाडीतील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे.

  • -MIN READ Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 5 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. चोरीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. दरवाजा उघडा ठेऊन अंगणात झोपणे, एका चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या घरातून दीड लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - दरवाजा उघडा ठेऊन अंगणात झोपणे बीडच्या खरकटवाडीतील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करत दीड लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी मच्छिंद्र तान्हाजी तांदळे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील देवळाली गावापासून जवळच असलेल्या खरकटवाडी येथे मच्छिंद्र तान्हाजी तांदळे कुटुंबासह राहतात. रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून तांदळे कुटुंब अंगणात झोपले. मात्र, यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. हीच संधी साधत उघड्या दरवाज्यातून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील दीडलाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच अंभोरा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. हेही वाचा -  Facebook वरील मुलाशी झालं प्रेम, Live-inमध्येही राहिले, पण चारित्र्यावर संशय आला अन् घडलं भयानक साठीत भोवले लिव्ह इन! 20 लाखांचा ऐवज घेऊन प्रेयसी फरार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 60 वर्षांच्या व्यक्तीची त्याच्या प्रेयसीनं फसवणूक केल्याची घटना  औरंगाबादमध्ये  उघड झालीय.  त्याच्या 40 वर्षांच्या प्रेयसीनं ‘तू म्हातारा झालास’ असं म्हणत त्याला ब्लॅकमेल केलं आणि ती त्याच्या दुसऱ्या्  प्रियकरासोबत  20 लाखांचा ऐवज घेऊन फरार झाली आहे.  या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानं पीडित व्यक्तीला न्याय मागण्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात